Lok Sabha Deputy speaker Awadhesh Prasad name in list: लोकसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला ( India Alliance)खास असे काही करता आलेले नाही. भाजपचे ओम बिर्ला (Om Birla) हे पुन्हा लोकसभेचे अध्यक्ष झालेले आहेत. आता उपाध्यक्ष निवडीसाठी घमासान होण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडी ही या पदासाठी कामाला लागलेली आहे. इंडिया आघाडीत हे पद समाजवादी पक्षाला हवे आहे. समाजवादी पक्षाकडून अवधेश प्रसाद यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे वृत्त आहे. 78 वर्षीय अवधेश प्रसाद (Awadhesh Prasad) हे दलित समाजातून येतात. ते अयोध्या या महत्त्वपूर्ण लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
‘प्रत्येक रामभक्त भाजपलाच मतदान करेल हे गृहीत धरणे चुकीचे’; उमा भारतींनी टोचले भाजपचे कान
यासाठी खास रणनिती आखण्यात येत आहे. तृणमुल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात अवधेश प्रसाद यांना उमेदवारी देण्यात नक्की झाले आहे. विशेष म्हणजे अवधेश प्रसाद यांच्या नावाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांची पसंदी दिली आहे. कारण अवधेश प्रसाद हे एक वेगळा चेहरा असणार आहे. त्यांना उमेदवारी दिल्यास देशात मजबूत असा संदेश जाईल.
रोहित-विराट पाठोपाठ रवींद्र जडेजाचाही मोठी घोषणा; T20 International cricketमधून निवृत्ती
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यात चर्चा झाल्यानंतर तृणमुल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी म्हणाले, इंडिया आघाडीने उपाध्यक्षपदासाठी अवधेश प्रसाद यांची निवड केल्यास वेगळा संदेश जाईल. इंडिया आघाडीकडे संख्याबळ कमी असले तरी यातून देशात इंडिया आघाडीबाबत एक चांगली प्रतिमा तयार होईल. इंडिया आघाडीचे प्रतिमा चांगली राहण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. इंडिया आघाडी उपाध्यक्षपदाची निवड लढेलच, असे तृणमुलच्या एका खासदाराने स्पष्ट केले आहे.
17 व्या लोकसभेला उपाध्यक्षच नव्हते
संविधानच्या अनुच्छेद 93 नुसार लोकसभेतील दोन सदस्यांना अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवडले जाईल. 17 व्या लोकसभेला उपाध्यक्ष नव्हता. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अशी वेळ होती. परंतु 17 व्या लोकसभेपेक्षा 18 वी लोकसभा निश्चित वेगळी आहे. कारण एकट्या भाजप पक्षाला बहुमत नाही. आता भाजपचे सरकार नसून, एनडीएचे सरकार आहे. त्यामुळे या अधिवेशनापासून सर्वच अधिवेशनामध्ये इंडिया आघाडीकडून सत्ता पक्षावर दबाव टाकला जाईल.