Download App

एकनाथ शिंदेंचा विधानसभेत राहुल गांधींना टोला; ‘आलू डालो…सोना निकालो’

इधर से आलू डालो उधर से सोना निकालो, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टोलेबाजी केलीयं. ते विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोलत होते.

Image Credit: Letsupp

Cm Eknath Shinde On Rahul Gandhi : इधर से आलू डालो उधर से सोना निकालो, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना टोला लगावलायं. दरम्यान, लोकसभा आणि विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. लोकसभेत राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल चढवत आहेत तर दुसरीकडे मोदी सरकारच्या विकासाचा दाखला देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहुल गांधींवर टोलेबाजी करीत आहेत.

Government Schemes : विहीर पुनर्भरण योजना (पोकरांतर्गत) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

मोदी सरकारने पाण्यात पाण्यासारखा रस्ता ‘अटल सेतू’ बांधलायं. पंडित जवाहरलाल नेहरुंनी सागरी सेतूचं स्वप्न पाहिलं होतं, अनेक वर्षे काँग्रेसची सत्ता होती पण सागरी सेतू झाला नाही. पंतप्रधान मोदी यांनी सागरी सेतू करुन दाखवला आहे. मोदींनी 25 कोटी लोकांना गरीबीच्या बाहेर काढलं, कोणी तरी म्हणालं की, इधर से आलू डालो…उधर से सोना निकालो, जे कोणी म्हणलं त्याचं मी नाव घेत नाही, अशी नाव न घेता टीका शिंदे यांनी राहुल गांधींवर केलीयं.

शिंदे यांनी गांधींवर टीका करताच विरोधकांडून शिंदेंची टीका रेकॉर्डवरुन काढण्याची मागणी करण्यात आली. यावेळी विरोधकांनी काहीसा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही, त्यामुळे मी रेकॉर्डवरुन काढू शकत नसल्याचं विरोधकांना सांगितलं.

मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला यश; नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशार दराडे यांचा विजय

तसेच राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना मंजूर झाली असून त्यासाठी 46 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जनतेला काही द्यायचं म्हटलं तर विरोधकांच्या पोटात काय दुखतंय हे माहित नसल्याचा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावलायं. तसेच बाळासाहेब ठाकरे नेहमीच सांगायचे की चांगल्याला चांगलचं म्हणायचं, विरोधकांना चांगल करता येत नसेल तर किमान बिनबुडाची टीका तरी करु नका, असा टोलाही शिंदेंनी लगावलायं.

पंतप्रधान मोदी संपूर्ण इंडिया आघाडीला पुरून उरणार आहेत. पंडित जवाहरलाल नेहरुंनी सागरी सेतूचं स्वप्न दाखवलं होतं देशात अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता होती पण सागरी सेतू झाला नाही. विरोधकांना 240 चा आकडा गाठायला 25 वर्ष लागतील, पण मोदींनी 10 वर्ष काम केलं म्हणून ते निवडून आले, असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

follow us

वेब स्टोरीज