राहुल गांधी पंतप्रधानपदाचा चेहरा असते तर 25 ते 30 जागा वाढल्या असत्या; राऊतांचे मोठे विधान
Sanjay Raut : लोकसभेत भाजपला (BJP) अपेक्षेप्रमाणे यश आलं नाही. 400 जागांचा नारा देणाऱ्या भाजपला केवळ 240 जागांपर्यंतच मजल मारता आली. तरीही एनडीएतील घटक पक्षांच्या पाठिंब्याने मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले आणि इंडिया आघाडी (India Alliance) विरोधात बसली. दरम्यान, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
PCMC अजितदादांना धक्का, शहराध्यक्षसह 16 माजी नगरसेवक पवारांना भेटले
संजय राऊतांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते राऊत म्हणाले,
राज्यात महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळणार आहे. आम्हाला 175 ते 180 जागा मिळतील, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. केंद्रात राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे चेहरे ठरवले असते तर इंडिया आघाडीला 25 ते 30 जागा अधिक मिळाल्या असत्या. कोणतेही सरकार बिनचेहऱ्याचे असून नये. आपण कोणासाठी मतदान करतो, हे लोकांना कळायला हवे. लोकांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना मतदान केले. मोदींना मतदान केलं, असं राऊत म्हणाले.
‘हिटमॅन’ रोहित आणि ‘किंग’ कोहली आज खेळणार शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना?, जाणून घ्या मोठी अपडेट
शुक्रवारी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवारांनी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. याविषयी राऊत म्हणाले, लाडकी बहीण असेल तर लाडका भाऊ का नको? आज या राज्यातील अनेक भाऊ बेरोजगार आहेत. महाराष्ट्रातील नोकऱ्या गुजरातमध्ये नेल्या जात आहेत. त्यामुळे तरुण बेरोजगार होत आहेत. मात्र, सरकार याचा गांभीर्याने विचार करत नसल्याचीटीका राऊतांनी केली.
फडणवीसांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही…
यावेळी बोलतांना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, फडणवीस यांनी फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. राज्यातील जनतेने त्यांच्या पक्षाला नाकारले आहे. ते स्वतःला नाना फडणवीसांचे मोठे भाऊ मानत होते, पण तसं काही नही. नाना फडणवीस हे साडेतीन शहाण्यांपैकी एक होते. त्या साडेतीन शहाण्यांमध्ये यांना स्थान नाही, अशी बोचरी टीका राऊतांनी केली.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. त्यांचा रोख उद्धव ठाकरेंकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, हेच पाहणं महत्वाचं आहे.