Assembly Session : विधानसभा निवडणुकीचं वेध लागलेलं असतानाच आता सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Assembly Session) सुरु झालं आहे. विधानपरिषदेच्या अधिवेशनात भाजपचे आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज्य सरकारच्या विकासकामांच्या लेखाजोखाचा प्रस्ताव मांडताना महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक प्रकारे खिल्लीच उडवल्याचं दिसून आलं आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणेनूसार ‘मुख्यमंत्री लाडकी योजने’ची माहिती देताना प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचे चेहरे किती? याबाबतची संपूर्ण यादीच वाचून दाखवलीयं.
दरेकर म्हणाले, राज्य सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, विरोधकांकडून या योजनवेर टीका-टीप्पणी केल्याचं दिसून येत आहे. विरोधकांना टीका करणं सोडून दुसरं काही काम राहिलेलं नाही. कुठेतरी काहीतरी शोधायचं आणि टीका करायची एवढचं महाविकास आघाडीचे नेते काम करीत आहेत. महाविकास आघाडीने सत्तेत असताना काहीच केलेलं नाही. त्यावेळी आम्ही प्रश्न मांडायचो तर तिजोरीत पैसे नसल्याचं सांगत असायचे, आता टीका करीत आहेत. विरोधक दोन्ही बाजूने ढोलकी वाजवत असल्याची सडकून टीका यावेळी दरेकरांनी केलीयं.
महाविकास आघाडीकडे किती मुख्यमंत्री?
आत्तापर्यंत काँग्रेसचे किती आमदार झालेले आहेत. काँग्रेमध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम, सतेज पाटील, अमित देशमुख असे 15 मुख्यमंत्री आहेत. हा फक्त काँग्रेसचा आकडा आहे. काँग्रेस पक्ष मोठा आहे तरीही तीन टर्म झाले 100 पेक्षा अधिक जागांच्या वर ते गेलेले नाहीत. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे(शिवसेना) गटाचे उद्धव ठाकरे संजय राऊत हे आहेत. तर शरद पवारांच्याही मनात आहे की व्हावं. असे एकूण 19 मुख्यमंत्री महाविकास आघाडीकडे आहेत. यासोबतच राष्ट्रवादीकडेही मुख्यमंत्री आहेत, लेक माझी लाडकीसाठीच हा सगळा खटाटोप सुरु आहे. शेवटी लेक माझी लाडकी योजना खूप चालते, तिकडे पण लेक (सुप्रिया सुळे) इच्छूक आहेतच दुसरीकडे रोहित पवार, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडही तयार असल्याचं दरेकरांनी म्हटलंय.
विरोधकांनी सध्या बहीणींचा धसका घेतला असून मुख्यमंत्री लाडकी योजनेवरुन विजय वडेट्टीवार म्हणतात की हक्कभंग आणणार, त्यावर राज्यापालांची सही नाही, पण हे सरकार जनतेसाठी आहे. राज्याची प्रचंड क्षमता आहे, लागेल तेवढे पैसे उभे करण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात असल्याचं म्हणत राज्यात पुन्हा एकदा महायुतीचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वासही प्रविण दरेकरांनी व्यक्त केलायं.
संविधानाचा खोटा नरेटिव्ह तयार करुन यश मिळवलंय…
विरोधकांना एकदा खोटं बोलून यश मिळालं आहे. संविधान हातात घेऊन विरोधक खोटं बोलंत होते. संविधानात दुरुस्ती झाली तेव्हा त्यांना आठवण झाली नाही, पण संविधानाची गनिमं पंतप्रधान मोदींना चांगलीच माहिती आहेत. मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी आधी संविधानाला अभिवादन केलं. विरोधकांना माहितीये की खोटं बोलो की आपला प्रयोग होतो असं त्यांना वाटतं, दुसरीकडे मनस्मृतीचं दहन केलं तिथं आव्हाडांनी तर फोटो फाडला होता बाबासाहेबांचा एवढं भान नाही आधी फोटो फाडायचा नंतर माफी मागायची हे आता तुम्ही थांबवा.
आमची लोकसभेला चूक झालीयं आता ती आम्ही दुरुस्त करत आहोत ते करायलाही मोठं मन लागत असल्याचा टोला प्रविण दरेकर यांनी लगावलायं.