Raj Thackeray : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत माहीम विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे. या मतदारसंघात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) निवडणूक लढत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची काल प्रभादेवी परिसरात सभा झाली. या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत एक आठवण सांगितली. तसेच अमित निवडणुकीला उभा राहत असताना मी मतांसाठी भीक मागणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितलं. शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांच्यावरही जोरदार टीका केली. जे कुणाचेच झाले नाहीत त्यांच्यावर काय बोलणार, असे राज ठाकरे म्हणाले.
ठरवलं तर यांची अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो; मुलगा अमित ठाकरेंच्या प्रचार सभेत राज ठाकरे गरजले
राज ठाकरे म्हणाले, ज्यावेळी उद्धव आजारी पडला त्यावेळी पहिला गाडी घेऊन मी गेलो होतो तिथे मी अलिबागला होतो, मला बाळासाहेबांचा फोन आला, अरे तुला कळलं का, असं असं झालंय. मी म्हटलं हो निघालोय मी. परिवाराच्या आड मी कधीच राजकारण येऊ दिलं नाही असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितले.
मला पक्ष फोडायचा नव्हता, माझ्यात ताकद असेल तर मी माझा पक्ष काढेन. तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजारी पडले. त्यावेळी मी पहिल्यांदा गाडी घेऊन गेलो होतो. मी कुटुंबाच्या आड कधी राजकारण आणत नाही. गेल्या वेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) वरळीतून निवडणुकीसाठी उभा होता , तेव्हा मी मनाने उमेदवार नाही दिला. त्यावेळी मी विचार केला की नाही आमच्या घरातील उमेदवार आहे, मी वरळीला उमेदवार देणार नाही. वरळीत मनसेची 38 हजार मतं आहेत. पण मी हे सर्व माझ्या मनाने केलं, कोणाला फोन केला नाही, असं राज ठाकरेंनी सांगितलं.