Sandeep Deshpande यांच्यावरील हल्ला प्रकरणी 2 जण ताब्यात; भांडूप परिसरातून क्राईम ब्रांच ची कारवाई

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande Attack) यांच्यावरील हल्लाप्रकरणी २ जणांना क्राईम ब्रांचनी ताब्यात घेतलं. मुंबईच्या भांडूप भागातून या २ जणांना अटक करण्यात आली. घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवली होती. तपासासाठी विशेष पथकाची देखील नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर अखेर आज २ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. संदीप देशपांडे […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 04T104716.598

Sandeep Deshpande

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande Attack) यांच्यावरील हल्लाप्रकरणी २ जणांना क्राईम ब्रांचनी ताब्यात घेतलं. मुंबईच्या भांडूप भागातून या २ जणांना अटक करण्यात आली. घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवली होती. तपासासाठी विशेष पथकाची देखील नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर अखेर आज २ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या २ जणांपैकी अशोक खरात हे शिवसेना महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार सेनेचे उपाध्यक्ष आहेत. ते भांडुपच्या कोकण नगर विभागाचे रहिवासी आहेत. आज सकाळी १०:३० वाजता गुन्हे शाखेने खरात यांना ताब्यात घेतले आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉक करत असताना काल ४ अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. क्रिकेट खेळताना जे स्टम्प्स वापरतात त्याद्वारे देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या चारही इसमांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला जातात याची आरोपींना कल्पना होती. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला.

कसब्यात रासनेंच्या झालेल्या पराभवाचं खापर ‘या’ 6 नेत्यांवर फुटणार

संदीप देशपांडे यांना थोडासा मार लागला. या हल्ल्याची माहिती समोर आल्यानंतर मनसैनिकांनी संताप व्यक्त केला. तर, याची माहिती समजताच शिवाजी पार्क पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला होता. संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना ४ जणांकडून मारहाण झाली होती. ते चौघे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. हल्ल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या. मनसे नेत्यांनी हल्ल्याप्रकरणी थेट युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊतांच्या चौकशीची मागणी केली आहे. तर नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांच्याकडे बोट दाखवलं होतं.

Exit mobile version