Ashish Shelar : अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून ठाकरे गटातील नेत्यांकडून भाजपवर जोरदार शाब्दिक हल्ले चढवले जात आहेत. तर दुसरीकडे भाजप नेतेही त्याला प्रत्युत्तर देत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आमदार अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार प्रहार केला आहे.
मुंबईकर हो, त्यांचे पब, पार्टी, पेंग्विनवाले स्वार्थाचे मुंबईला उद्धवस्त करणारे राजकारण ओळखा असे शेलार यांनी म्हटले आहे. त्यांनी एक ट्विट केले आहे. बुलेट ट्रेनला त्यांनी विरोध केला. भाजपाने आपला संकल्प कायम ठेवला. मुंबई-दिल्ली कॉरिडोरला त्यांनी विरोध केला भाजपाने विकासाचा मार्ग नाही सोडला. मुंबईकरांच्या मेट्रोलाही त्यांचा विरोध होताच पण, भाजपाने मेट्रो रुळावर आणलीच.
◆ गिफ्ट सिटीचे मुंबईला मिळालेले गिफ्ट "त्यांनी" घालवले, भाजपाने ते परत मिळवले
◆ बुलेट ट्रेनला "त्यांनी" विरोध केला, भाजपाने आपला संकल्प कायम ठेवला
◆ मुंबई -दिल्ली कॉरिडॉरला "त्यांनी" विरोध केला भाजपाने विकासाचा मार्ग नाही सोडला.
◆ भाजपाने "त्यांच्या" विरोधाला न जुमानता कोस्टल…— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 16, 2023
गिफ्ट सिटीचे मुंबईला मिळालेले गिफ्ट त्यांनी घालवले, भाजपाने ते परत मिळवले. बुलेट ट्रेनला त्यांनी विरोध केला, भाजपाने आपला संकल्प कायम ठेवला. मुंबई-दिल्ली कॉरिडोरला त्यांनी विरोध केला. भाजपाने विकासाचा मार्ग नाही सोडला. भाजपाने त्यांच्या विरोधाला न जुमानता कोस्टल रोडचा आपला संकल्प प्रत्यक्षात उतरवला. मुंबईकरांच्या मेट्रोलाही त्यांचा विरोध होताच, पण भाजपाने मेट्रो रुळावर आणलीच.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला आयआयएम दिली प्रत्येक वेळी विरोध करणारे ते कपाळ करंटे त्यातही शिंकतील! म्हणून तमाम मुंबईकर हो, त्यांचे पब, पार्टी, पेंग्विनवाले स्वार्थाचे मुंबईला उद्धवस्त करणारे राजकारण ओळखा.. आणि चला.. मुंबईला भरभरून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत विकासाची एक वाट चालू या! माझ्या तरुण मित्रांनो एका तुमच्या सहीत तुमचे भविष्य रेखाटू या! आम्ही फक्त मागतोय तुमच्याकडे.. एक सही भविष्यासाठी!! असे शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
‘पक्षात आता दोन गट पण, भविष्यात’.. राष्ट्रवादीच्या आमदाराचे नव्या धक्कातंत्राचे संकेत?