‘पक्षात आता दोन गट पण, भविष्यात’.. राष्ट्रवादीच्या आमदाराचे नव्या धक्कातंत्राचे संकेत?

‘पक्षात आता दोन गट पण, भविष्यात’.. राष्ट्रवादीच्या आमदाराचे नव्या धक्कातंत्राचे संकेत?

Ashutosh Kale : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) परदेशात होते. त्यामुळे ते कोणत्या गटात याबाबत गोंधळ निर्माण झाला होता. नंतर काही दिवसांनी त्यांचे सासरे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. नंतर आ. काळे यांनी परदेशातूनच प्रतित्रापत्र पाठवून देत अजितदादांना पाठिंबा जाहीर केला. परदेशातून आल्याबरोबर थेट अजितदादांची भेट घेतली. ट्विट करत माहितीही दिली. यानंतरच ते अजित पवार यांच्यासोबत आहेत यावर शिक्कामोर्तब झाले.

राज्याच्या राजकारणात पुन्हा धक्कातंत्र : अजित पवारांसह सर्व मंत्री शरद पवारांच्या भेटीला

आशुतोष काळे म्हणाले, त्यांना अजित पवार गटाकडून आगामी विधानसभा निवडणुकीत दिलं जाईल असे वाटतं. अजितदादांचं बंड ज्यावेळेस घडलं तेव्हा मी परदेशात होतो. मला ज्यावेळी याची कल्पना आली. त्यावेळी माझा फोन डायव्हर्ट केलेला होता. आता हे घडल्यानंतर मला फोन येतील पुन्हा येण्यासाठी सांगितलं जाईल याचीही कल्पना होती. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक परिवार असून एकसंघपणे काम करतो. पण अशा घडामोडी ज्यावेळी घडल्या त्यावेळी एक द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती. परंतु, तरीही निर्णय घेतला. या निर्णयाच वाईटही वाटतं. काही वेळेस असे निर्णय घ्यावे लागतात असे स्पष्ट करत भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघपणे वाटचाल करील, असा विश्वास कोपरगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, आपण आत्ता जरी विचार करतोय की पक्षात दोन गट पडले आहेत. एक अजित पवारांचा गट आणि दुसरा शरद पवारांचा गट. परंतु, भविष्या आम्ही एकसंघपणे आणि एका विचाराने एकत्र काम करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यामध्ये मला जी काही मदत करता येईल ती मी निश्चित करेन.

आशुतोष काळे अजितदादांच्या गटात कसे गेले… वाचा पडद्यामागची कहाणी खुद्द त्यांच्याच जुबानी

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube