आशुतोष काळे अजितदादांच्या गटात कसे गेले… वाचा पडद्यामागची कहाणी खुद्द त्यांच्याच जुबानी

आशुतोष काळे अजितदादांच्या गटात कसे गेले… वाचा पडद्यामागची कहाणी खुद्द त्यांच्याच जुबानी

Ashutosh Kale on NCP Crisis : अजितदादांचं बंड ज्यावेळेस घडलं तेव्हा मी परदेशात होतो. मला ज्यावेळी याची कल्पना आली. त्यावेळी माझा फोन डायव्हर्ट केलेला होता. आता हे घडल्यानंतर मला फोन येतील पुन्हा येण्यासाठी सांगितलं जाईल याचीही कल्पना होती.परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक परिवार असून एकसंघपणे काम करतो. पण अशा घडामोडी ज्यावेळी घडल्या त्यावेळी एक द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती. परंतु, तरीही निर्णय घेतला. या निर्णयाच वाईटही वाटतं. काही वेळेस असे निर्णय घ्यावे लागतात असे स्पष्ट करत भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघपणे वाटचाल करील, असा विश्वास कोपरगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा आ. काळे परदेशात होते. त्यामुळे ते कोणत्या गटात याबाबत गोंधळ निर्माण झाला होता. नंतर काही दिवसांनी त्यांचे सासरे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. नंतर आ. काळे यांनी परदेशातूनच प्रतित्रापत्र पाठवून देत अजितदादांना पाठिंबा जाहीर केला. परदेशातून आल्याबरोबर थेट अजितदादांची भेट घेतली. ट्विट करत माहितीही दिली.  यानंतरच ते अजित पवार यांच्यासोबत आहेत यावर शिक्कामोर्तब झाले.

या घडामोडींनंतर आमदार काळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपण हा निर्णय का घेतला, पडद्यामागे नेमकं काय घडलं, याचा खुलासा केला. ते पुढे म्हणाले,  पक्षातील सर्वच आमदारांची तशीच परिस्थिती होती. एका बाजूला पवार साहेब आहेत तर दुसऱ्या बाजूला अजितदादा. परंतु आता शेवटी या वर्षभरामध्ये विरोधी पक्षांमध्ये काम करत असताना एवढ्या प्रमाणामध्ये जेवढे सत्ताधारी पक्षांमध्ये आम्हाला काम करता येत होते.

लोकांची काम मार्गी लागत होती तशी ती विरोधी पक्षात असताना होत नव्हती. म्हणून कोपरगाव मतदारसंघाचे मतदार आहेत त्यांनी मला संधी दिली. या संधीच्या माध्यमातून त्यांचे काम जास्तीत जास्त मार्गी लागण्यासाठी विचार ठेवून दादांची भेट घेतली आणि दादांच्या कानावर घातले. लोकांची काम झाली पाहिजेत आपण जेवढे शक्य होतील तेवढे जास्तीत जास्त कामे करू आणि न्याय देण्याचं काम करू शकतो,असे काळे म्हणाले.

अजित पवार गटाचे आमदार आज ना उद्या अपात्र होणारच; आव्हाडांचे मोठे वक्तव्य

माझे आजोबा राज्यमंत्री म्हणून पवार साहेबांच्या मंत्रिमंडळात काम करत होते आणि त्यावेळेस पासूनचे आमच्या काळे परिवाराचे संबंध आहेत. त्यामुळे पवार साहेब मला आजोबांच्या जागी आहेत. मी एक कार्यकर्ता म्हणून पवार साहेब आणि अजितदादांकडे बघून आमच्या आजोबांकडे आणि वडिलांकडे बघून त्या सर्व कामकाज केले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन काम करणार आहोत.

मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षातील अन्य वरिष्ठ नेत्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. आता जरी अजितदादांबरोबर गेलो असलो तरी पक्षातील सर्वच नेत्यांशी संपर्क कायम राहिल. मी जरी एक छोटा कार्यकर्ता असलो तरी आम्ही एक एकत्र येऊन याठिकाणी भविष्यकाळामध्ये काम करू या असे मला वाटते.

माझ्यावर कुणाचाच दबाव नव्हता

अजित पवार यांच्या गटाबरोबर जाण्याचे म्हणा किंवा पवार साहेबांची साथ सोडण्याचा मुद्दा असो कोणाकडूनच काही दबाव नव्हता शेवटी प्रत्येक आमदारांनी त्यांची परिस्थिती होती जे काही विचार मनामध्ये चालू होते त्याचा विचार करून सर्वांनी निर्णय घेतल्याचे काळे यांनी सांगितले. उमेदवार झालेले आहेत त्यांना तिकीट त्यांच्या पक्षाने त्यांनी सांगितलं पाहिजे काही जागा आता राष्ट्रवादीला आहे त्यांनी त्याच्यावरती काय करावे त्यांचा विषय आणि कोण कुठून लढायचं विषय मी काय सांगू शकत नाही पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्यानुसारच होईल असे काळे यांनी आगामी निवडणुकीत तिकीट मिळणार का या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.

शिवसेनेच्या तीन आमदारांचे शेवटचे अधिवेशन ठरणार? ठाकरे गटाने आखली आक्रमक व्यूहरचना

 

निर्णय घेतला त्याचं वाईट वाटतं

आता हा निर्णय घेतला त्याचं तर वाईट वाटतंच. पण कुठेतरी असे निर्णय घ्यावे लागतात. आता मला खात्री आहे की भविष्यकाळात आहे आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून एकत्रित काम करू. भविष्यामध्ये राष्ट्रवादी हा एकच पक्ष एकसंघ राहील असं मला वाटतं आणि हे सर्व होत असतानाच त्या ठिकाणी वाईट वाटलं, असे आमदार आशुतोष काळे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube