Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीतील प्रचार सुरू आहेत. या काळात गैरप्रकार वाढीस लागतात. मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी पैसे वाटप होत असल्याचे प्रकार याआधी घडले आहेत. त्यामुळे अशा गैरप्रकारांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस सतर्क आहेत. निवडणूक भरारी पथकेही अलर्ट असतात. त्यांच्या याच सतर्कतेमुळे काल मुंबई उपनगर परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. निवडणूक भरारी पथकाकडून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात होता. या तपासणीदरम्यान सोनापूर सिग्नल परिसरात एका वाहनात पैसे सापडले. या गाडीतील ही रक्कम जवळपास तीन ते साडेतीन कोटींच्या आसपास आहे.
Baramati Loksabha : पिढीला जन्म देणारी सून बाहेरची कशी? अजितदादांचा शरद पवारांना टोला
काल पोलिसांनी सोनापूर सिग्नल परिसरात नाकाबंदी केली होती. या दरम्यान येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात होती. यावेळी पोलिसांनी एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनासारखे एक वाहन अडवले. या वाहनाची तपासणी केल्यावर पैसे सापडले. या पैशांबाबत या वाहनातील लोकांकडे चौकशी केली. परंतु, त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे ही गाडी भांडूप पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. यानंतर आयकर विभागाचे कर्मचारी येथे आले. त्यांनी या घटनेबाबत पोलिसांकडून माहिती घेतली आणि पुढील तपासाला सुरुवात केली.
आता गाडीतील इतके पैसे नेमके कुणाचे आहेत. हे पैसे कुठे नेले जात होते याची माहिती घेण्याचे काम सध्या सुरू आहे. पथकाने पैशांची मोजणी केली. भरारी पथकाने पकडलेली गाडी एटीएमचे पैसे वाहतूक करणाऱ्या गाडीसारखी आहे. त्यामुळे गोंधळाचं वातावरण आहे. या घटनेतील आधिक माहिती घेण्याचं काम सुरू आहे. या प्रकाराचा संपूर्ण तपास झाल्यानंतरच यातील सत्य बाहेर येईल.
Loksabha Election 2024 : मतदानाआधीच भाजपने खातं उघडलं; सुरत मतदारसंघात ‘कमळ’ फुललं..