Download App

Ghatkopar Hoarding : ढिगाऱ्यात आणखी दोन मृतदेह सापडले; आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू

घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. मंगळवारी रात्री आणखी दोन मृतदेह या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले.

Ghatkopar Hoarding Collapse : मुंबईतील घाटकोपर मध्ये मुसळधार पाऊस आणि वाऱ्याच्या वेगाने (Ghatkopar Hoarding Collapse) होर्डिंग कोसळून मोठा दुर्घटना घडली आहे. आज तिसऱ्या दिवशीही येथे मदतकार्य सुरुच आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. मंगळवारी रात्री आणखी दोन मृतदेह या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता १६ झाली आहे. दरम्यान, या प्रकरणात पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

‘घाटकोपर’प्रकरणात राजकारणाला उकळ्या; सोमय्या, राणे अन् कदमांनी ठाकरेंना घेरले

मुंबईत सोमवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसापासून वाचण्यासाठी काही जण घाटकोपर येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एका मोठ्या होर्डिंगखाली थांबले होते. त्याचवेळी होर्डिंग खाली कोसळले. या होर्डिंगखाली अनेक जण दबले गेले. वाहनांचेही मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत आधी १४ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते.

यानंतर मदतकार्य सुरू करण्यात आले. आज तिसऱ्या दिवशीही मदतकार्य सुरुच होते. मंगळवारी या ढिगाऱ्याखालून आणखी दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या अपघातात जवळपास ७० हून आधिक जखमी झाले आहेत. या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे बेकायदेशीरपणे जाहिरात होर्डिंग लावणाऱ्या एजन्सीच्या मालकावर गुन्ह दाखल करण्यात आला आहे. सध्या तो फरार आहे. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी सात पथके तयार केली आहेत.

नियम पायदळी तुडवून तत्कालीन सरकारची परवानगी : सोमय्या

घाटकोपर मध्ये लावण्यात आलेले होर्डिंग बेकायदेशीर होते. येथे फक्त ४० बाय ४० चे होर्डिंग लावण्याची परवानगी होती. प्रत्यक्षात मात्र १२० बाय १२० फूट उंचीच होर्डिंग उभारण्यात आले. नंतर हेच होर्डिंग वारा आणि पावसाच्या तडाख्याने कोसळले. तत्कालीन सरकारने नियमांकडे दुर्लक्ष करत परवानगी दिली. शहरात आजमितीस ४०० पेक्षा जास्त बेकायदेशीर होर्डिंग आहेत, असा दावा सोमय्या यांनी केला.

follow us