Download App

Devendra Fadnavis : मनसे-भाजप युती होणार का? फडणवीस म्हणाले, आमची राज ठाकरेंबरोबर…

Devendra Fadnavis reaction on MNS-BJP Alliance : लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत (Lok Sabha Election) तशा युती आणि आघाड्यांच्या चर्चा ऐकू येत आहेत. भाजपकडून नवीन मित्र शोधण्याची मोहिम सुरू झाली आहे. मागील आठवड्यात मनसे नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. त्यानंतर मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांवर मनसे नेत्यांनी अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत. फडणवीस यांनी मात्र लोकमतला दिलेल्या मुलाखतीत मनसे आणि राज ठाकरेंबरोबरच्या (Raj Thackeray) संबंधांवर भाष्य केले आहे.

फडणवीस म्हणाले, आगामी काळात मनसे कुठे असेल, कुणाबरोबर असेल हे वेळच सांगेल. आमची राज ठाकरे यांच्याबरोबर मैत्री आहे. भेटीगाठीही होत असतात. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा होतात. ते अनेक सूचनाही मांडत असतात. काही वेळेस आमच्यावर टीकाही करतात. परंतु, आम्ही एकत्र येऊन काम करू की नाही याचं उत्तर आज देता येणार नाही. लवकरच आपल्याला समजेल. मनसे आणि भाजप युतीवर अद्याप काहीच निर्णय झालेला नाही.

पूर्वीचे ठाम अन् परखड राज ठाकरे शोधतोय : मनसेच्या महायुतीतील एन्ट्रीच्या चर्चांवर थोरातांची खोचक टीका

follow us