‘मोदींनी मणिपूरमध्ये जाऊनच दाखवावं’; अमेरिकेला निघालेल्या मोदींना उद्धव ठाकरेंचे चॅलेंज!

Uddhav Thackeray Challenges PM Narendra Modi : शिवसेनेच्या (UBT) राज्य पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमित शाह आणि भाजपवर घणाघाती टीका केली. वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल संकुल येथे शिबीर सुरू असून या शिबिरातूनच त्यांनी पंतप्रधान मोदी यांना आव्हान दिले. सरकारला मस्ती दाखवायची असेल तर […]

UPSC Exam

UPSC Exam

Uddhav Thackeray Challenges PM Narendra Modi : शिवसेनेच्या (UBT) राज्य पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमित शाह आणि भाजपवर घणाघाती टीका केली. वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल संकुल येथे शिबीर सुरू असून या शिबिरातूनच त्यांनी पंतप्रधान मोदी यांना आव्हान दिले.

सरकारला मस्ती दाखवायची असेल तर मणिपुरमध्ये (Manipur Violence) दाखवा. मणिपूर जळत असताना मोदी मात्र अमेरिकेला निघाले आहेत. पण मणिपूरमध्ये जायला तयार नाहीत. विश्वगुरू अमेरिकेत जाऊन विकत घेतलेल्या लोकांसमोर ज्ञान पाजळणार. पण मणिपूर हे माझ्या देशातील एक राज्य आहे. रशिया-युक्रेनचं युद्ध तुम्ही थांबवलंत ही भाकड कथा सांगितलीत. ही भाकड कथा सत्य करायची असेल तर मणिपूर शांत करून दाखवा. जायचंच असेल तर आधी मोदींनी मणिपुरात जाऊन दाखवावं. आम्हीही पाहू की लोक त्यांचे ऐकतात का. त्यासाठी मनात आग पेटायला पाहिजे, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना दिले.

Uddhav Thackeray : अब्दालीचा किस्सा ऐकवत उद्धव ठाकरेंनी सांगितला सरकारचा डाव

आज सगळी लुटालूट सुरू आहे. मुंबई तर ते तोडूच शकत नाहीत. म्हणून ते काय करत आहेत तर मुंबईचे महत्व कमी करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी आम्ही मुंबईचं महत्व कमी होऊ देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला.

मला संताप एका गोष्टीचा येतो, उपरे नेते आपल्या घरात दमदाट्या करतात. आपल्या घरात येऊन फोडाफोडी करतात. त्यांना मला एवढेच सांगायचं आहे की आम्ही नामर्दाची औलाद नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. याआधी शिवसेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनीही भाजप सरकारवर घणाघाती टीका केली.

खबरदार! पुन्हा हात उचलाल तर.. 

उद्धव ठाकरे यांनी अयोध्या पौळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आपल्या भाषणात उल्लेख केला. तसेच ठाणे येथील शिंदे नावाच्या महिला भगिनीवर झालेल्या हल्ल्याचाही उल्लेख केला. यापुढे आमच्या महिला भगिनींवर हात उचलाल तर ते हात पुन्हा दिसणार नाहीत, असा खणखणीत इशारा त्यांनी दिला.

Exit mobile version