Uddhav Thackeray : शिवसेनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपवर घणाघाती टीका केली. यासाठी त्यांनी शिवसेना जनता पक्षात विलीन करण्याचा जुन्या नेत्यांनी बाळासाहेबांना दिलेला पर्याय आणि बाळासाहेबांनी त्यांना दिलेले उत्तर. अफगाणिस्तानातून आलेला अहमदशाह अब्दाली यांचा किस्सा सांगत सरकारचा काय डाव चालला आहे हे सांगितले.
ठाकरे म्हणाले, आणीबाणीचा काळ मला आठवतो. तेव्हा जनता पक्षाची लाट आली होती. त्यावेळी शिवसेनेत जे नेते होते त्यांनी बाळासाहेबांना सांगितले की आता शिवसेना जनता पक्षात विलीन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यावर बाळासाहेब म्हणाले, मला माझे आठ दहा शिवसैनिकच पुरेसे आहेत. कारण ते निष्ठावंत आहेत. गद्दारांबरोबर जाण्यापेक्षा गद्दारांचे नेतृत्व करण्यापेक्षा माझ्या आठ दहा शिवसैनिकांना घेऊन मी शिवसेना पुन्हा उभी करीन.
‘आम्हीही नाराजी व्यक्त केली पण आमच्यावर’.. कायदेंच्या पक्षप्रवेशावर पाटील स्पष्टच बोलले
आजही तोच डाव चालला आहे. अफगाणिस्तानातून आलेल्याचं नाव काय होतं माहिती आहे का. काहीतरी शाहच होतं ना. तो बाहेरून आला होता. मोठी फौज घेऊन आला होता. तो मराठ्यांचे सैन्य पाहत होता. त्याने आपल्या खबऱ्याला विचारले. की आता आपले काय होणार. खबऱ्या म्हणाला आपले काही खरे नाही. त्यावर अब्दाली म्हणाला,या धुराच्या रेषा कशाच्या दिसत आहेत.
खबऱ्या म्हणाला, हे मराठे पराक्रमात कुणाला ऐकत नाहीत. पण, हे अठरापगड जातीत विखुरले आहेत म्हणून यांच्या चुली वेगळ्या आहेत. इतके ऐकल्यानंतर अब्दाली म्हणाला बस उद्याचं युद्ध आपण जिंकलं. खबऱ्या म्हणाला असं कसं होणार. त्यावर अब्दाली म्हणाला अरे जे जेवायला एकत्र येत नाहीत ते लढायला आणि मरायला काय एकत्र येणार? हीच आपली ग्यानबाची मेख आहे. मराठ्यांत फूट पाडा आणि राज्य करा. ही निती आजची नाही. आजचे हे बसलेले वरचे मराठ्यांची मुंबई लुटत आहेत हे तुम्हाला मान्य आहे का असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला.
वाघ निघाले गोरेगावला, वाघ कसले वाघाचे कातडे पांघरून लांडगे निघालेत, राऊतांच्या शिंदे टोला
मुंबई तोडू देणारच नाही
आज सगळी लुटालूट सुरू आहे. मुंबई तर ते तोडूच शकत नाहीत. म्हणून ते काय करत आहेत तर मुंबईचे महत्व कमी करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी आम्ही मुंबईचं महत्व कमी होऊ देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला.