वाघ निघाले गोरेगावला, वाघ कसले वाघाचे कातडे पांघरून लांडगे निघालेत, राऊतांच्या शिंदेना टोला

  • Written By: Published:
वाघ निघाले गोरेगावला, वाघ कसले वाघाचे कातडे पांघरून लांडगे निघालेत, राऊतांच्या शिंदेना टोला

Sanjay Raut On Eknath Shinde वाघ निघाले गोरेगावला परंतु गोरेगावचे सर्व वाघ तर येथे बसले आहेत. देशभरातील सर्व वाघ हे सध्या या सभागृहात उपस्थित आहे. मग गोरेगावला कोण चालय असा विचार मी केला. परंतु गोरेगावला वाघ नाहीतर वाघाचे कातडे पांघरून लांडगे निघाले असा टोला यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना लगावला. ते शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या राज्यव्यापी पदाधिकारी शिबिरात बोलत होते.  (Sanjay Raut’s criticism of Eknath Shinde and Devendra Fadnavis)

शिवसेनेच्या जन्माची तारीख यांना माहित नाही आणि निघाले शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करायला. त्या निवडणूक आयोगाला खोके देऊन ही तारीख घेतली काय असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी शिंदेंना केला. आदित्य त्जकारे यांनी मुंबईचा संपूर्ण रोडमॅप समोर मांडला या देशात आणि राज्यात कशी लुटा – लूट चालेली आहे. या लुटीवर राऊतांनी एक कविता सादर केली. दो मस्ताने चले जिंदगी बनाने, चुना लगाके पुरा देश डुबाने असे म्हणत संजय राऊतांनी मोदी – शहावर निशाणा साधला. तसेच असे दोन लुटारू महाराष्ट्रात देखील आहेत यावरून त्यांनी शिंदे – फडणवीसांना टोला लगावला.

आता – आता 88 हजार कोटी रुपयांच्या छापलेल्या नोटा गायब झाल्या या नोटा गेल्या कुठे असा सवाल राऊतांनी मोदींना केला. या 88 हजार कोटींच्या नोटा महाराष्ट्रातील आमचं सरकार पाडण्यासाठी वापल्या असाव्यात. त्यामधूनच हे खोके सरकार बनलं असावं.

मुख्यमंत्र्यांविरोधात लोकायुक्तांचे हत्यार? आदित्य ठाकरेंचा कडक इशारा

पुढे आमदार मनीष कायदे यांच्या शिंदेसोबत जाण्यावरून राऊतांनी त्यांना टार्गेट केले. रयत म्हणता आपल्याकडच्या एक बाई तिकडे गेल्या मला माहित होत त्यांना खूप घाई होती म्हणून त्या गेल्या असाव्यात त्या आल्या ही घाई – घाईत आणि गेल्या ही घाई – घाईत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube