मुख्यमंत्र्यांविरोधात लोकायुक्तांचे हत्यार? आदित्य ठाकरेंचा कडक इशारा

  • Written By: Published:
मुख्यमंत्र्यांविरोधात लोकायुक्तांचे हत्यार? आदित्य ठाकरेंचा कडक इशारा

राज्यव्यापी पदाधिकारी शिबिरात बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबई महानगरपालिकेत मोठे घोटाळे झाले आहेत. त्याची चौकशी करायला हवी, त्यासाठी आम्ही लोकायुक्ताकडे जाणार असल्याचा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. (aaditya-thackeray-on-eknath-shinde-allegation-bmc)

५० खोकेवाल्यांचे मुख्यमंत्री हे मुंबईत बिल्डर मित्रांसाठी काम करत आहेत. रस्त्यासाठी सहा हजार कोटी रुपये खर्च करत आहे. त्यात महाघोटाळा होत आहे. त्याबाबत मी आवाज उठविल्यानंतर एक हजार कोटी रुपयांनी हा खर्च कमी केला आहे. हे पैसे फुकट बिल्डरांच्या घशात घालणार होते, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.


भाजपचे नेते शिंदे गटाच्या मंत्र्यांविरोधात मला पुरावे देतात; सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट

आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईत एकही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. केवळ पाच बिल्डर मित्रांना चाळीस टक्के फायदा मुख्यमंत्र्यांना द्यायचा आहे. ते मुंबईला खड्ड्यात घालणार आहे. सध्या खडी घोटाळा सुरू आहे. खडी आमच्या मार्फत गेली पाहिजे असे सांगितली जात आहे. त्यातून ५ कोटी प्रत्येक आठवड्याला त्यांना मिळत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे. खडी क्रशरसाठी महसूल विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाहीत.

काँग्रेस अन् गांधी परिवार ओबीसीद्रोही, भाजप प्रवेशानंतर आशिष देशमुखांचा हल्लाबोल…

महापालिकेत एक कंत्राटदार तेरा वस्तू देणार आहे. तेरा हजार बेंच, दहा हजार कुंड्या खरेदी केल्या जाणार आहेत. हे बेंच कुठे बसविणार आहे. कुंड्यात झाडे कुठले लावणार आहे. यासाठी सव्वाशे कोटी खर्च लागणार असताना तो अडीचशे कोटी रुपये खर्च दाखविले जाणार आहे. हा मोठा घोटाळा आहे, याची चौकशी करण्यासाठी लोकायुक्ताकडे तक्रार केली जाणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले आहे.

आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या काळात झालेल्या मुंबईतील विकासकामांचे प्रेझेंटेशनही यावेळी दाखविले आहे. त्यातील काही कामे आमच्या काळात झालेली असताना त्याचे श्रेय हे सरकार घेत असल्याची टीकाही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube