Download App

आमदार वाढले, मते वाढली तरीही सरकारमध्ये डीमोशन? अजितदादांच्या कोंडीची तयारी..

या निवडणुकीत अजित पवार गटाचा स्ट्राइक रेट चांगला राहिलेला असतानाही मंत्रिमंडळात त्यांना कमी संधी मिळण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सरकारच्या या पाहिली विस्तारात शिंदे गट, अजित पवार गट, भाजप यांच्याबरोबरच आणखी काही लहान पक्षांना संधी मिळणार आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळाचा (Cabinet Expansion) जो फॉर्म्युला समोर आला आहे त्यावर नजर टाकली तर अजित पवार गटाला झटका बसण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) गटाचा स्ट्राइक रेट चांगला राहिलेला असतानाही मंत्रिमंडळात त्यांना कमी संधी मिळण्याची शक्यता आहे.

पाच आमदारांमागे एक मंत्रिपद

मंत्रिमंडळ विस्ताराचं जे चित्र समोर आलं आहे त्यानुसार पाच आमदारांच्या हिशोबाने एक मंत्रिपद दिले जाणार आहे. यानुसार अजित पवार गटाला जास्तीत जास्त 8 मंत्रीपदे मिळू शकतात. सध्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार मंत्रिमंडळात आहेत. याआधीच्या शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 9 मंत्री होते. त्यामुळे आताचा फॉर्म्युला पहिला तर त्यांना एक मंत्रिपदाच नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अजित पवार कुणाला ड्रॉप करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण अजित पवारांच्या कोट्यातील सर्व मंत्री विजयी होऊन पुन्हा विधानसभेत पोहोचले आहेत.

उपाध्यक्ष पदावरही सस्पेन्स कायम

मागील सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसकडे विधानसभेचे उपाध्यक्ष पद होते. नरहरी झिरवळ उपाध्यक्ष होते. आता मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून या पदाची मागणी केली जात आहे. परंपरेचा विचार करून उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला दिले पाहिजे असा तर्क ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. 2019 मधील दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या राष्ट्रवादीला हे पद देण्यात आले होते. या पदावर आता शिंदे गटाचा देखील डोळा आहे. सरकारमध्ये शिवसेना दुसरा मोठा पक्ष आहे. जर शिंदे गटाने या पदाचा हट्ट धरला तर हे पद त्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे असे सांगितले जात आहे.

ठरलं तर! उद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार; CM फडणवीस स्वतः भावी मंत्र्यांना करणार फोन

खातेवाटपातही पवार गटाचे डीमोशन

खातेवाटपातही अजित पवार गटाला फारसे महत्त्व मिळाले नाही. टिव्ही 9 च्या रिपोर्टनुसार अर्थ आणि गृह खाते भाजप स्वतः कडेच ठेवणार आहे. 2022 मध्ये शिंदे सरकारमध्ये हे पद भाजपकडेच होते. परंतु अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर यातील अर्थ खाते राष्ट्रवादीला देण्यात आले होते. आता मात्र अजित पवार यांना अन्य खाते मिळणार आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना महसूल आणि नगरविकास मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे. शिंदे सरकारच्या काळात महसूल खाते भाजपकडे होते. अजित पवार यांना जर अर्थ खाते मिळाले नाही तर अजितदादा पहिल्यांदाच अर्थ खात्याविना उपमुख्यमंत्री असतील.

अजितदादांच्या डीमोशनची कारणे काय

आमदार संख्या आणि समीकरण

अजित पवार ज्यावेळी सरकारमध्ये सहभागी झाले होते त्यावेळचे राजकीय समीकरण वेगळे होते. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना बरोबर घेऊन भाजप वाटचाल करत होता. त्यामुळे अजित पवार गटाला मंत्रिमंडळात झुकते माप देण्यात आले. आता मात्र राजकीय समीकरणे पूर्ण बदलली आहेत. यावेळीही भाजप सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे आता भाजपला दुसऱ्या पक्षांची फारशी गरज राहिलेली नाही. त्यामुळे कोणताही सहकारी पक्ष भाजपवर दबाव बनवू शकलेला नाही. अजित पवार तर आजिबात रिस्क घेण्याच्या मानसिकतेत नाहीत.

जागा जास्त पण मते काकांपेक्षा कमीच

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या असल्या तरी शरद पवार गटाच्या (Sharad Pawar) तुलनेत मते मात्र कमीच मिळाली आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार अजित पवार गटाला 9 टक्के तर शरद पवार गटाला 11 टक्के मते मिळाली आहेत. परंतु मते जास्त मिळालेली असतानाही शरद पवार गटाचे फक्त 10 आमदार निवडून आले.

मूठ घट्ट राहिली पाहिजे; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर रोहित पवारांच्या आईचे मोठं विधान

सन 2014 आणि 2019 मधील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 17-17 टक्के मते मिळाली होती. यावेळी दोन्ही गटांना संयुक्त रूपाने एकूण 21 टक्के मते मिळाली आहेत. म्हणजेच चार टक्के जास्त. ही चार टक्के जास्तीची मते अजित पवार गटाला मिळाल्याचे सांगितले जात आहे.

follow us