मूठ घट्ट राहिली पाहिजे; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर रोहित पवारांच्या आईचे मोठं विधान
बारामती : शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त काल (दि.12) उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकुटूंब पवारांच्या दिल्लीतील निवास्थानी भेट देत शरद पवारांना शुभेच्छा दिल्या. यानंतर आता अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या सर्वात आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज असून, मूठ घट्ट राहिली पाहिजे असे मोठं आणि सूचक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर खरचं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलताना सुनंदा पवार यांनी वरील विधान केलं आहे.
मविआला बेचिराख करण्याचा भाजपचा मास्टर प्लॅन राऊतांनी फोडला; म्हणाले, अजितदादांना…
काय म्हणाल्या सुनंदा पवार?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज असून, मूठ घट्ट राहिली पाहिजे असे विधान करत कुटूंब म्हणून आता एकत्र येण्याची गरज असून, दिल्लीत शरद पवार आणि अजित पवारांची भेट राजकीय नव्हती तर, कौटुंबिक होती असेही यावेळी सुनंदा पवार यांनी सांगितले. दिल्लीतील पवारांच्या भेटीकडे कसे बघता यावर बोलताना त्या म्हणाल्या की, अजित पवार आणि शरद पवार यांच्या कालच्या भेटीकडे मी कौटुंबिक प्रसंग याच नजरेतूनचं बघते. कारण काल पवार साहेबांना 85 वं वर्ष सुरू झालेलं असून, आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा टप्पा नव्याकडे जात असताना कुटूंब म्हणूनचं रोहित पवार, अजित पवार आणि सुनेत्रा पवार त्या ठिकाणी पवार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठीच एकत्र आले होते.सत्तेसोबत जायचं का याबाबत शरद पवार निर्णय घेणार आहेत. कुटूंब म्हणून आता एकत्र येण्याची गरज आहे.राष्ट्रवादीत आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे, असं सुनंदा पवार म्हणाल्या आहेत.
… तेव्हा अटलजी काय म्हणतील या भीतीने मी खूप घाबरलो, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला ‘तो’ किस्सा
खासदार फोडण्यासाठी अजितदादांना खास ऑफर