ठरलं तर! उद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार; CM फडणवीस स्वतः भावी मंत्र्यांना करणार फोन
Maharashtra Government : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार (Maharashtra Government) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन दहा दिवस उलटून गेले तरीही मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्हता. अखेर या विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. उद्या (15 डिसेंबर) भारतीय जनता पार्टीचे 21, शिवसेनेचे 12 आणि अजित पवार गटाचे दहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, उद्या सकाळी 11 वाजता किंवा दुपारी 4 वाजता नागपूर येथे शपथविधी (Nagpur) सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (Devendra Fadnavis) दुपारनंतर स्वतः भावी मंत्र्यांना फोन करणार असल्याची माहिती आहे.
..तेव्हा अटलजी काय म्हणतील या भीतीने मी खूप घाबरलो, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला ‘तो’ किस्सा
मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार कुणाला डच्चू दिला जाणार याची चर्चा काल दिवसभर सुरू होती. भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने सर्वाधिक मंत्रीपदं त्यांनाच मिळणार हे निश्चित आहे. पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला किती मंत्रीपदं मिळणार याची उत्सुकता कायम आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाच आमदारांमागे एक मंत्रिपद असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत अजून खात्रीशीर माहिती नाही. पण याच फॉर्म्युल्यानुसार मंत्रिपदांचं वाटप झालं तर स्ट्राईक रेट चांगला असूनही अजित पवार गटाला नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आज दुपारनंतर मुख्यमंत्री फडणवीस स्वतः भावी मंत्र्यांना फोन करणार आहेत. तुम्हाला शपथ घेण्यासाठी यायचं आहे असे मुख्यंमंत्र्यांनी सांगितल्यानंतरच मंत्रिपद मिळणर हे निश्चित मानले जात आहे.
लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं?, गारगार वाटायचं; नार्वेकरांचं अभिनंदन, अजित पवारांची टोलेबाजी
मंत्रिमंडळाचा विस्तार आजच होणार होता. यासाठी राजभवन निश्चित करण्यात आले होते. मुख्यमंत्री कार्यालयाने राजभवनाला तसे पत्र दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर राजभवनात तयारी सुरू झाली होती. परंतु, नंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळविण्यात आले की शपथविधी कार्यक्रम नागपूरला होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांच्याशी फोनवरून चर्चा करत त्यांना शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्याची विनंती केली.
कुणाला मंत्रिपद मिळणार याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. वेगवेगळे तर्क बांधले जात आहेत. असे असले तरी कुणाला संधी द्यायची यावर अंतर्गत निर्णय झाला असल्याची माहिती आहे. आता वरवर चर्चा सुरू असल्या तरी मंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, भरत गोगावले, आशिष जयस्वाल, योगेश कदम, विजय शिवतारे, आबिटकर किंवा यड्रावकर यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते.
भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, शिवेंद्रसिंह राजे भोसले, रवींद्र चव्हाण, जयकुमार रावल, अतुल सावे, माधुरी मिसाळ, संजय कुटे, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, अतुल भातखळकर, नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर या आमदारांची नावे चर्चेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, नरहरी झिरवळ, अनिल पाटील, संजय बनसोडे आणि मकरंद पाटील या आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच सना मलिक, संग्राम जगताप आणि इंद्रनील नाईक यांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळेल अशी शक्यता आहे.