Download App

स्वतःती गाडी जाळली, सदावर्तेंची फोडली, तुरुंगातही गेला : मराठा आरक्षण आंदोलनाचा ‘साबळे पॅटर्न’

मुंबई : मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांना जामीन मंजूर झाला आहे. मंगेश साबळे, वसंत बनसोडे, राजू सावे अशी तिघांची नावे आहेत. तिघांनाही पाच हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. (Mangesh Sable who vandalized the vehicle of lawyer Gunaratna Sadavarte by pelting stones)

आज (26 ऑक्टोबर) या तिघांनी मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात सदावर्ते यांच्या वाहनाची तोडफोड केली होती. तसंच ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणाही दिल्या होत्या. राज्यभरात हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले होते. दरम्यान, या प्रकरणानंतर सदावर्ते यांना थेट मुंबईत जाऊन भिडणारे हे तिघे तरुण नेमके कोण आहेत? असा सवाल विचारला जात आहे.

Maratha Reservation : ‘जरांगेंनी वेळ दिला होता तेव्हा झोपा काढल्या का?’ मनसे आमदाराचा सरकारला सवाल

कोण आहे मंगशे साबळे?

मंगेश साबळे हे नाव महाराष्ट्रात यापूर्वीही चर्चेत आले होते. मंगेश साबळे हे छत्रपती संभाजीनगर येथील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच आहेत. अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यासाठी ते ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी फुलंब्री पंचायत समितीसमोर गटविकास अधिकाऱ्याचा निषेध म्हणून दोन लाख रुपये उधळत अनोखे आंदोलन केले होते. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती.

गटविकास अधिकारी विहीरीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे मागत असल्याचा आरोप करत मंगशे साबळे यांनी हे आंदोलन केले होते. आपण विहिरींचे कामे दिले होती. मात्र, ती कामे पैसे दिल्याशिवाय होत नसल्यामुळे पैसे उधळण्याचा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या आंदोलनाचा व्हिडीओ समाज माध्यमांवर आणि माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यानंतर गटविकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.

Manoj Jarange : वाहनांच्या तोडफोडीचे समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात अनेक महिला व पुरुष जखमी झाले होते. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे मंगेश साबळे यांनी आपली नवीकोरी कार पेट्रोल टाकून जाळून टाकली होती. या घटनेचाही व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. आता थेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केल्याने मंगेश साबळे चर्चेत आले आहेत.

Tags

follow us