Maratha Reservation : ‘जरांगेंनी वेळ दिला होता तेव्हा झोपा काढल्या का?’ मनसे आमदाराचा सरकारला सवाल

Maratha Reservation : ‘जरांगेंनी वेळ दिला होता तेव्हा झोपा काढल्या का?’ मनसे आमदाराचा सरकारला सवाल

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात (Maratha Reservation) पुन्हा चर्चेत आला आहे. राज्य सरकारने आरक्षणावर काहीच निर्णय न घेतल्याने मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. अन्न आणि औषधही घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या उपोषणामुळे राज्य सरकारची धावपळ सुरू झाली आहे तर दुसरीकडे विरोधकांनीही सरकारची कोंडी केली आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी कडक शब्दांत राज्य सरकारला सुनावले आहे.

ते म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे हे मागेही बोलले होते की सर्वांची इच्छा आहे तर आरक्षण का देत नाहीत. जरांगे पाटील यांना आश्वासन दिलं की काही दिवसात आरक्षण दिलं जाईल त्यांनी तो वेळ दिला होता. त्यावेळेस यांनी का झोपा काढल्या. आता टोकाशी आल्यावर त्यांना सांगतात उपोषणाला बसू नका. दोन पावलं मागे घ्या अजून वेळ द्या. पण, हे प्रकार का होतात असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. मराठा समाजाला आता टिकणारं आरक्षण द्यावं लागेल. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. परंतु, फक्त तोंडाला पाने पुसण्याचे काम सुरू आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

Sanjay Raut : भीती अन् निराशेपोटी मोदी महाराष्ट्रात; राऊतांचा हल्लाबोल

केंद्र सरकारच मराठा आरक्षणावर तोडगा काढू शकते – राऊत

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे. राज्य सरकार अद्याप यावर काहीच तोडगा काढू शकलेलं नाही. आता मोदीच यावर तोडगा काढू शकतात. केंद्र सरकार निर्णय घेऊ शकतं. मनोज जरांगेंना मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर बसवावं आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा असे आम्ही आधीच म्हणालो होतो पण, तसे काही घडत नाही. आता मोदी भाषण देऊन निघून जातील. भारतीय जनता पार्टीतील अर्ध्यापेक्षा जास्त लोक भाषणमाफिया आहेत.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. राजकीय नेते, लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा निर्णय अनेक गावांत घेण्यात आला आहे. सरकारी पातळीवर काय हालचाली सुरू आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. सत्ताधारी गटातील नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण देणारच. त्यासाठी सरकारला थोडा वेळ द्या अशी मागणी केली होती. मात्र, जरांगेंनी निर्धार कायम ठेवत उपोषण सुरू केले आहे. यानंतर आता सरकारी पातळीवर काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Maratha Reservation : गुणरत्न सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड; मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज