Mangesh Satmakar : ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची गळती थांबल्याचे नाव घेत नाही. सेनेत दोन गट पडल्यापासून अनेक आमदार, खासदार, कार्यकर्ते हे उबाठाची (UBT) साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहेत. काही दिवसांपूर्वी नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शिंदे ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक आणि शिक्षण समितीचे माजी सभापती मंगेश सातमकर (Mangesh Satmakar) यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकून शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान, सातमकर यांचा शिंदे गटात प्रवेश झाल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. (Mangesh Satamkar left the UBT and joined the Shinde group)
मंगेश सातमकर यांनी आज (28 जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सीएम शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. आणि त्यांना त्यांना त्यांच्या भावी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नरिमन पॉइंट येथील बाळासाहेब भवनात पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार मनीषा कायंदे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, शिवसेना उपनेत्या कला शिंदे, शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी आणि सातमकर यांच्या प्रभागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#मुंबई महानगरपालिकेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि माजी शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर यांनी आज त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.… pic.twitter.com/JpOld4jQzC
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 28, 2023
या पक्षप्रवेशाबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी ट्विट केलं. त्यांनी लिहिलं की, मुंबई महापालिकेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि माजी शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर यांनी आज आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीसाठी सामाजिक व राजकीय प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. मुंबई महापालिकेत 1994 पासून नगरसेवक असलेले सातमकर यांनी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, एमएमआरडीए समितीचे सदस्य, शिक्षण समितीचे तीन वेळा सभापतीपद भूषवले आहे. पक्षात त्यांना नक्की न्याय दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Tamil Nadu : भाजपच्या ‘एन मन, एन मक्कल’ यात्रेला सुरुवात; मंत्री शाह यांनी दाखवला हिरवा झेंडा
ते म्हणाले, एखादा कार्यकर्ता अडचणीत असताना नेत्यानं त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं, अशी त्याची अपेक्षा असते. पण जेव्हा अडचणी येतात, तेव्हाच खरा आधार नसेल तर मग कार्यकर्त्यांचं खच्चीकरण होतं. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमीच कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे कार्यकर्त्यांना नवे बळ मिळायचं. अनुभवी कार्यकर्ता घडवायला खूप वेळ लागतो पण त्याला गमवायला एक क्षणच पुरतो, असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळं मंगेश सातमकर यांना शिवसेनेत पूर्ण न्याय मिळेल. तसंच राज्य सरकारच्या पुढाकाराने आपल्या प्रभागातील समस्या सोडविल्या जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
विधान परिषदेच्या उपासभापती नीलम गोऱ्हे, विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्यानंतर ठाकरे गटाला हा चौथा मोठा धक्का मानला जात आहे.