Manoj Jarange Patil : मराठा आंदोलन निर्णायक अवस्थेत असताना आंदोलनात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यावर मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढ्यातील महत्त्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) यांनी गंभीर आरोप केले आहेत.
23 डिसेंबरला गुप्त मिटिंग काहींसोबत यांनी केली. मी साक्षी आहे. रांजणगाव गणपती येथे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत गुप्त मिटिंग केली. लोणावळा, वाशी येथेही समाजाला वगळून मिटिंग केली. वाशी आंदोलनापर्यंत मी आंदोलक म्हणून सहभागी होतो मात्र त्यांचा मिटिंगमुळे मला आक्षेप होता, असा आरोप बारस्कर महाराज यांनी केला आहे.
पुणे पोलिसांना मोठा यश! तब्बल तीन हजार कोटींहून अधिकचं एमडी जप्त, पाच जणांना अटक
ते पुढं म्हणाले की जरांगेला काडीची अक्कल नाही. पंधरा मिनिटात शासन निर्णय आणि अधिसूचना द्या म्हणे. अर्धवट ज्ञान बेक्कार असतं म्हणतो पण स्वतःच काय? सगळ्या अधिकाऱ्यांसोबत हा मिटिंग घेत होता, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
मनोज जरांगेची मुलगी म्हणते माझ्या बापाच्या देव पाया पडेल. इतका अंहकार मुलांमध्ये देखील आहे. सांगा हा देवापेक्षा मोठा आहे का? हा माझ्यावर आरोप करतो की मी सरकार आणि भुजबळांचा माणूस आहे. पण आरक्षणाच्या संबंधने सांगतो की माझा आणि कोणाचा संबंध नाही. आजपर्यंत एकही पत्र सरकारला त्याने स्वतः दिलं नाही. तो रोज पलटी मारतो. सर्व मिटिंग कॅमेऱ्यासमोर करतो आणि याला घोडा लावतो त्याला घोडा लावतो म्हणतो, असा हल्लाबोल बारस्कर महाराज यांनी केला.
युगेंद्र जोगेंद्र कोणीही येऊ द्या, फरक पडणार नाही, राजकीय भूकंप होणारच; मिटकरींचा दावा
मी मनोज जरांगेच्या प्रत्येक कृतीला साक्षी आहे. प्रसिद्धीसाठी किंवा पैशासाठी करतोय तर बिलकुल नाही. मी कीर्तन करायचे पैसे घेत नाही. आताच हे का झालं तर काही दिवसांपासून माझ्या मनातील खडखद व्यक्त केली, असे देखील बारस्कर यांनी सांगितले.