Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले आहे. मराठा आरक्षण, राज्यातील आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. या बैठकीला शरद पवार, अशोक चव्हाण, उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती, अंबादास दानवे यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित आहेत. मात्र उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) बोलवण्यात आलं नाही. यावरुन खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले की आरक्षणाचा प्रश्न सुटणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. संकुचित मनोवृत्तीने हा प्रश्न सुटणार नाही. या प्रश्नात राजकारण केलं जाऊ नये. हा आमचा विषय आहे. ही आमची भूमिका आहे. महाराष्ट्र पेटत असेल तर सर्व पक्षाने एकत्र येऊन याचा मार्ग काढायला हवा आहे.
सर्वपक्षीय बैठक बोलवलेली आहे मात्र या बैठकीत ऐरे गैरे नथूलाल बोलावले आहेत. ज्यांचा एकही आमदार नाही. पक्षाचं अस्तित्व नाही, एखादा आमदार आहे अशा सर्वांना आमंत्रित केलं आहे. पण 16 आमदार आणि सहा खासदार असलेल्या शिवसेनेला, माजी मुख्यमंत्र्यांनी बोलवले नाही ही त्यांची संकुचित मनोवृत्ती आहे. हा डरपोकपणा आहे, अशी त्यांनी टीका केली.
Pramod Kamble : नगरच्या शिल्पकारानं बनवलेल्या सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं आज अनावरण
हेतू पुरस्कृत शिवसेनेला बोलावले नाही. मुख्यमंत्र्यांना ही बैठक बोलवण्याचा अधिकार नाही. 31 डिसेंबरनंतर ते कायमचे घरी बसणार आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्री अपात्र ठरणार आहेत. पण सध्या मनोज जरांगे यांचे प्राण वाचवा. मनोज जरांगे म्हणतात एक उपमुख्यमंत्री काडीखोर आहेत. खरं म्हणजे एक फुल दोन हाफ हे मंत्री काडीखोर आहेत. यांनीच महाराष्ट्र पेटवला आहे. आमच्या या सर्वपक्षीय बैठकीला शुभेच्छा आहेत, प्रश्न सोडवा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Maratha Reservation : ‘…तर पाणीही बंद करणार’; मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा अल्टिमेटम!
आतापर्यंत नेट बंद हे आम्ही जम्मू कश्मीर आणि मणिपूरला केलं असं समजत होतो. पण महाराष्ट्रात देखील नेट बंद केले जातंय. याचा अर्थ तुमच्या नियंत्राखाली काहीच नाही. इंटरनेट कधी बंद करतात जेव्हा कायदा सुव्यवस्थेची स्थिती हाताबाहेर जाते तेव्हा सर्व समाज माध्यमे बंद केली जातात. या सरकारने ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.