Pratap Sarnaik on MNS Mira Bhayandar Morcha : अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून आज मनसे आणि ठाकरे गटाने (Mira Bhayandar Morcha) मोर्चाचे आयोजन केले होते. परंतु, या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. मोर्चेकऱ्यांची धरपकड केली. यावरून राज्यातील राजकारण तापले. विरोधकांनी राज्य सरकारच्या या कारभारावर टीकेची झोड उठवली आहे. सत्ताधारी गटातील मंत्री सुद्धा सरकारची अडचण करू लागले आहेत. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी (Pratap Sarnaik) पोलिसांची कारवाई अतिशय चुकीची असल्याचे म्हटले आहे. मी स्वतः मोर्चात सहभागी होणार आहे. हिंमत असेल तर मला अटक करा असे आव्हान त्यांनी दिले आहे. दरम्यान, राज्य सरकारमधील मंत्र्यानेच आव्हान दिल्याने महायुती सरकारची कोंडी झाली आहे.
सरनाईक म्हणाले, पोलिसांनी एका पक्षासाठी काम करू नये. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. मी पोलीस आयुक्तांशी बोलून नाराजी व्यक्त केली आहे. गृहखात्याचे आदेश नव्हते तरी देखील पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरुन धरपकड केली याची माहिती घेतली जात आहे. यानंतर मंत्री प्रताप सरनाईक स्वतः या मोर्चात सहभागी झाले आहेत. मराठी माणसाचा आवाज दाबला जाणे सहन होत नसल्याने मोर्चात आलो अशी माहिती त्यांनी दिली.
Video : मनसेला मोर्चाला परवानगी का दिली नाही? CM फडणवीसांनी क्लिअर सांगितलं..
मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला शांततेने मोर्चा काढला. पण मराठी भाषिकांनी शांततेत मोर्चा काढण्यास परवानगी मागितली तर कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटीसा काढण्यात आल्या. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. पोलिसांच्या हुकुमशाही व दडपशाही गुंडगिरीला माझा विरोध आहे. मी देखील मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. हिंमत असेल तर पोलिसांनी मला अटक करून दाखवावी असे आव्हान प्रताप सरनाईक यांनी दिले.
मिरा भाईंदरमध्ये काही दिवसांपूर्वी अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चाला परवानगी कशी दिली असे विचारले असता फडणवीस म्हणाले, मी याबाबत पोलिसांना विचारलं होतं. त्यावर सीपींनी सांगितलं की मनसेने स्पेसिफिक रुटचा आग्रह केला होता. ज्या ठिकाणी मोर्चा काढणं कठीण होतं असा मार्ग मागण्यात आला होता. नंतर काल रात्री त्यांनी आम्हाला सभा घ्यायची आहे त्यासाठी परवानगी मागितली गेली. त्याचीही परवानगी त्यांना दिली.
ठीक आहे तुम्ही सभा घ्या. पण त्यांना स्पेसिफिक अशा ठिकाणीच मोर्चा न्यायचा होता ज्यातून काही अडचणी निर्माण झाल्या असत्या. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. आता इतकी वर्ष आपण सगळेच मोर्चे काढत आहोत. मोर्चे काढताना आपण पोलिसांशी चर्चा करून रूट ठरवत असतो. आता 5 तारखेला दोन संघटनांचा मोर्चा काढायचा ठरला होता त्यावेळीही पोलिसांशी चर्चा करुनच रुट फायनल झाला होता.
Video : मुख्यमंत्री खोटारडे, मराठी माणसांची ताकद दाखवतोच, मनसेचं थेट फडणवीसांना चॅलेंज