Video : मुख्यमंत्री खोटारडे, मराठी माणसांची ताकद दाखवतोच, मनसेचं थेट फडणवीसांना चॅलेंज

MNS Sandeep Deshpande On Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आम्ही मोर्चाला परवानगी देत होतो, फक्त रुट बदलायला सांगत होतो, असं सांगितलं. अशातच मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मुख्यमंत्री खोटारडे असून, आता महाराष्ट्रातला मराठी माणूस मीरा-भाईंदरच्या दिशेने निघाला आहे.आम्हाला पाहायचं आहे जेलची क्षमता जास्त आहे की मराठी माणसाची संख्या जास्त आहे असे म्हणत मनसेच्या देशपांडेनी थेट फडणवीसांना चॅलेंज दिले आहे.
Video : दुबे मराठी माणसाला नव्हे तर, संघटनेवर बोलले; भाषिक वादात फडणवीसांनी काय सांगितलं?
संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले?
आम्ही मोर्चाला परवानगी देत होतो, फक्त रुट बदलायला सांगत होतो असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं. पण पोलीस मोर्चाची परवानगी द्यायला तयार नव्हते. घटना घडली मिरा रोडमध्ये, व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोडमध्ये आणि आम्हाला सांगत होते मोर्चा काढा घोडबंदर रोडवर. याचा अर्थ पोलिसांना परवानगी द्यायची नव्हती.
मोर्चाआधीच धरपकड! पहाटे साडेतीन वाजता मनसेच्या ‘या’ बड्या नेत्याला घेतलं ताब्यात
गुजरात्यांवर गुन्हे दाखल केले आमच्यावर देखील करायचे होते आम्ही नाही म्हटलं नव्हतं का? मात्र अशा खोट्या समजुती पसरवू नका असे म्हणत, आता महाराष्ट्रातला मराठी माणूस मीरा-भाईंदरच्या दिशेने निघाला असून, जेलची क्षमता जास्त आहे की, मराठी माणसाची संख्या जास्त आहे हे आम्हाला पाहायचं असल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे. आता हे आंदोलन जोपर्यंत तुम्ही मोर्चाची परवानगी देत नाही, तोपर्यंत सुरू राहणार…”, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आम्ही मोर्चाला परवानगी देत होतो, फक्त रुट बदलायला सांगत होतो, असं सांगितलं. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्टीकरणाचं खंडन केले आहे. #MNS #RajThackeray #Mirabhaindar @Dev_Fadnavis @RajThackeray @mnsadhikrut pic.twitter.com/JdK8espn1T
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 8, 2025
हिंमत असले तर मला अटक करा : प्रताप सरनाईक
एकीकडे मोर्चा काढण्यासाठी मनसेकडून आक्रमक पवित्रा घेतल्याचे चित्र असतानाच दुसरीकडे महायुती सरकारमधील मंत्र्यानेच फडणवीस आणि सरकारला थेट आव्हान दिले आहे. पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची आहे. व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला परवानगी देता मग मराठी एकीकरण समिती मोर्चा काढत होती. तर तुम्हाला काय अडचण होती? त्यांना मोर्चा का काढू दिला नाही. यामुळे महायुती सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे.
स्वत: हिंदीचा अहवाल स्विकारून मोर्चातून मनसेवर कुरघोडी; सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला
पोलिसांची कारवाई अतिशय चुकीची असल्याचे म्हटले आहे. मी स्वतः मोर्चात सहभागी होणार आहे. हिंमत असेल तर मला अटक करा असे आव्हान त्यांनी दिले आहे. मराठी भाषिकांनी शांततेनं मोर्चा काढण्यास परवानगी मागितली होती. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी चर्चा झाली. पोलिसांच्या हुकुमशाही व दडपशाही गुंडगिरीला माझा विरोध असून, मी देखील मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे सांगत हिंमत असेल तर, पोलिसांनी मला अटक करून दाखवावी असे थेट आव्हन सरनाईक यांनी दिल्याने महायुती सरकारची कोंडी झाली आहे.