Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी देशासह राज्यात पाचव्या टप्प्यांत मतदान पार पडलं. यामध्ये मुंबईतील सहा मतदारसंघासह, नाशिक, दिंडोरी, धुळे, पालघर, भिवंडी, कल्याण आणि पालघरमध्ये मतदान पार पडलं. मतदान प्रक्रियेदरम्यान संथ गतीने मतदान सुरु असल्याचा आरोप करत जाणूनबुजून अडचणी निर्माण केल्या जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत केलायं. उद्धव ठाकरेंच्या आरोपांनंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी बिनबुडाचे आरोप म्हणत ठाकरेंकडून आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलीयं. एकूण मुंबईत आज मतदान प्रक्रियेदरम्यान, राडा, गोंधळ सुरु असल्याचे प्रकार दिसून आले आहेत.
केजरीवालांविरोधात ED न्यायालयात; 14 दिवसांच्या कोठडीची मागणी…
मतदान प्रक्रिया सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी खोटी आणि दिशाभूल करणारी विधान केली आहेत. सोबतच भाजपवर बिनबुडाचे आरोप केले असून त्यांच्यावर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे केलीयं.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
मुंबईत मतदान प्रक्रियेदरम्यान, जाणूनबुजून काही ठिकाणी अडचणी निर्माण केल्या जात आहेत. तसंच, आमच्या लोकांना अडचणी निर्माण केल्या जात आहेत, याबाबत योग्य ती खबरदारी निवडणूक अधिकाऱ्यांकडून घेतली नाही तर आपण न्यायालयात जाऊ. लोकांना त्रास दिला जात असेल तर मतदानासाठी आलेल्या लोकांचं उद्या सकाळी 7 वाजपर्यंत मतदान घेण्याची वेळ आली तरी घावं लागेल. अन्यथा आपण यामध्ये हस्तक्षेप करणार असल्याचा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला होता.
तसेच आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून मतदान नीट व्हावं यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न करावेत असं म्हटलं होतं. काही ठिकाणी मतदान केंद्रावर ईव्हीएमबाबतही तक्रारी समोर आल्या आहेत. तसंच, मुंबईकर उन्हा तान्हात मतदानासाठी उतरले आहेत. मुंबईतील लोक मतदानासाठी रांगा लावत आहेत. तासन तास मतदानासाठी रांगेत आहेत. पोलिंग बुथवर सोयी सुविधा नाहीत. पाण्याची सोय नाही, पंखे नाहीत. ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. आम्ही काही करू शकत नाही. प्रयत्न केला तरी गुन्हा दाखल होईल असंही ठाकरे म्हणाले.