Lok Sabha Election: मुंबईत काँग्रेस-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा ! दोन्ही गट पोलिस ठाण्यात समोरासमोर

  • Written By: Published:
Lok Sabha Election: मुंबईत काँग्रेस-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा ! दोन्ही गट पोलिस ठाण्यात समोरासमोर

Lok Sabha Election: राज्यातील पाचव्या टप्प्यात तेरा मतदारसंघात मतदान पार पडले आहे. पण मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात मतदानादरम्यान प्रचंड गोंधळ उडाला होता. मतदारांची नावे न सापडणे, मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू होती. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत काही मतदान केंद्रावर मतदान सुरू होते. काही ठिकाणी महाविकास आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाणीची घटना घडल्या आहेत. दक्षिण मध्य मुंबईतील एका मतदान केंद्रावर बूथ लावल्याच्या कारणातून काँग्रेस, ठाकरे गटाच्या व भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. या प्रकरणी दोन्ही गट सायन पोलिस ठाण्यात समोरासमोर आल्याने गोंधळ उडाला आहे. भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे.


Pune Accident News : अटक होण्याच्या भीतीने बिल्डर विशाल अग्रवाल फरार, पोलिसांचा शोध सुरु

दक्षिम मध्य मुंबईत ठाकरे गटाचे अनिल देसाई (Anil Desai) आणि शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांच्यात लढत झाली आहे. हा मतदारसंघ उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासाठी प्रतिष्ठेचा झालेला आहे. या मतदारसंघासाठी मतदान प्रक्रियेत गोंधळ झाला आहे. तसेच कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आहे. सुंदर कमलानगर येथील मतदान केंद्रावर भाजपचे वॉर्ड अध्यक्ष जयस्वाल आणि काँग्रेसचे दोन कार्यकर्ते यांच्यामध्ये वाद झाला आहे. भाजपचे कार्यकर्त्याला बूथ लावून देण्यात आले नाही. या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचे आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. ठाकरे व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे लोक दमदाटी करत असल्याचा आरोप केला.

‘आप’ला अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंडमधून कोट्यवधी रुपयांचा बेकायदेशीर निधी, ईडीचा गृहमंत्रालयाला अहवाल

त्यानंतर भाजपचे आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर व इतर भाजप पदाधिकारी हेही पोलिस ठाण्यात आले. त्यामुळे काहीवेळ गोंधळ उडाला. दोन्ही बाजूने एकमेंकाविरोधात घोषणाबाजी केली जात होती. कमला नगर बूथमध्ये इजाज आणि रफिक नावाच्या माणसांनी ज्या पद्धतीमध्ये महायुतीच्या बुथवर जाऊन आमचे वॉर्ड अध्यक्ष जयस्वाल यांची कॉलर पकडली पोटात खंजीर खुपसू, बूथ बंद करा कशासाठी मतदान करताय अशा प्रकारच्या धमक्या दिल्याचा आरोप लाड यांनी केला.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणाहून निघून गेलो. परंतु काँग्रेस आणि उबाठाचच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनला गराडा घातला. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले पोलिसांना आम्ही सांगितलं जे सत्य आहे त्या माध्यमातून गुन्हा दाखल करा, अशी मागणी लाड यांनी केली आहे. या प्रकरणी ओमप्रकाश जयस्वाल यांनी दोघांविरोधात तक्रार दिली आहे.

मतदानाच्या प्रक्रियेवरून आरोप प्रत्यारोप
मुंबईत मोठ्या संख्येने मतदार मतदानासाठी बाहेर पडले होते. परंतु मतदानाची प्रक्रिया संथगतीने सुरू होती. त्यामुळे मतदारांना तासांतास रांगेत उभे राहावे लागत होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर आरोप केले आहे. मतदान होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे. त्याला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पराभव दिसत असल्याने उद्धव ठाकरे हे रडीचा डाव खेळत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज