Pune Accident News : अटक होण्याच्या भीतीने बिल्डर विशाल अग्रवाल फरार, पोलिसांचा शोध सुरु

Pune Accident News : अटक होण्याच्या भीतीने बिल्डर विशाल अग्रवाल फरार, पोलिसांचा शोध सुरु

Pune News : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात बिल्डर विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांचा अल्पवयीन मुलगा (वेदांत अग्रवाल) Vedant Agrwal याने आपल्या कारने तरुण-तरुणीला (Pune Accident) चिरडले. या प्रकरणी अल्पवयीन मुलासह वडिलांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक होण्याच्या भीतीने विशाल अग्रवाल फरार झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी अल्पवयीन मुलाला न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे तर वडिलांवर आणि अल्पवयीन मुलाला मद्य देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलायं. पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून विशाल अग्रवाल यांचा शोध सुरु आहे.

जंगली रमीबद्दल सचिन तेंडुलकर दखल घेणार नसतील तर तीव्र आंदोलन करणार -बच्चू कडू

अल्पवयीन मुलाला रेस्टॉरंटमध्ये मद्य देणाऱ्या रेस्टॉरंटसह त्याच्या वडिलांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगा मद्य घेत असल्याची माहिती त्याच्या वडिलांनाही होती. त्याला मद्य पिण्यास परवानगी देण्यात आल्याप्रकरणी वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आलायं. त्यानुसार पोलिसांकडून तपास सुरु आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून या घटनेचा तपास सुरु असल्याचं पोलिस आयुक्तांकडून सांगण्यात आलं होतं. त्यानुसार पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांचा शोध सुरु होता. मात्र, ते फरार झाले असल्याचं समोर आलं होतं.

Box Office : ‘श्रीकांत’ बॉक्स ऑफिसचा बादशाह! 10 व्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी, ओलांडला 25 कोटींचा टप्पा

नेमकं काय घडलं?

प्रसिद्ध बिल्डर ब्रह्मा कॉर्पोरेशनचे विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत याने अत्यंत बेदरकारपणे आलिशान कार चालवत रस्त्यावरील वाहनांना धडक दिली. यामध्ये दोघेजण चिरडले गेले. शनिवारी मध्यरात्री हा भीषण कल्याणनगर येथे अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवर असलेली तरुणी हवेत उडाली आणि त्यानंतर जमीनीवर आदळून तिचा जागीच मृत्यू झाला. अश्विनी कोस्टा असं मृत तरुणीचं नावं आहे. तर अपघातात जमखी झालेले अनीस अवलिया यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन कोर्टात हजर केलं. त्यावेळी वेदांत याचे वकील प्रशांत पाटील यांनी न्यायालयाला सांगितले की, घडलेली घटना दुर्दैवी असली तरी कलमात जामीन मिळण्याची तरतूद आहे. न्यायालयाने ही बाब मान्य करत त्याला जामीन मंजूर केलायं. मात्र, न्यायालयाने काही प्रमुख अटी व शर्तींसह हा जामीन मंजूर केलायं. त्यानुसार, आरोपीला येरवड्याच्या वाहतूक पोलिसात 15 दिवस काम करावे लागणार आहे. तसेच आरोपीने अपघातावर निबंध लिहावा, आरोपीने मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावेत, अशा अटी कोर्टाने घातल्या. व त्याचा अहवाल कोर्टाला सादर करावा, असं कोर्टाने सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज