अपघातावर निबंध लिही, ट्रॅफिक सेवक म्हणून काम कर; मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडणाऱ्याला अजब शिक्षा

अपघातावर निबंध लिही, ट्रॅफिक सेवक म्हणून काम कर; मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडणाऱ्याला अजब शिक्षा

Pune Accident : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात आलिशान कार चालवत दोघांना चिरडले. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerwada Police Station) अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत गुन्हा दाखल करून कोर्टात (Pune Court) हजर केले असता कोर्टाने अल्पवयीन मुलाला अटी शर्थींसह जामीन दिला आहे. त्याचबरोबर अल्पवयीन मुलाला 14 दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत सेवक म्हणून काम करावे लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण ? शिंदेंना टेन्शन वाढवणारे फडणवीस यांचे उत्तर 

कसा झाला अपघात ?
पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर ब्रह्मा कॉर्पोरेशनचे विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत याने अत्यंत बेदरकारपणे आलिशान कार चालवत रस्त्यावरील वाहनांना धडक दिली. यामध्ये दोघेजण चिरडले गेले. शनिवारी मध्यरात्री हा भीषण कल्याणनगर येथे अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवर असलेली तरुणी हवेत उडाली आणि त्यानंतर जमीनीवर आदळून तिचा जागीच मृत्यू झाला. अश्विनी कोस्टा असं मृत तरुणीचं नावं आहे. तर अपघातात जमखी झालेले अनीस अवलिया यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला.

नॅचरल आईस्क्रिमचे संस्थापक अन् Ice Cream Man म्हणून ओळख असणाऱ्या रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचं निधन 

कोर्टाने काय शिक्षा दिली? 

दरम्यान, पोलिसांना अपघाताची माहिती मिळतात त्यांनी वेदात अग्रवाल ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले. त्यावेळी वेदांत याचे वकील प्रशांत पाटील यांनी न्यायालयाला सांगितले की, घडलेली घटना दुर्दैवी असली तरी कलमात जामीन मिळण्याची तरतूद आहे. न्यायालयाने ही बाब मान्य करत वेदांत अग्रवालला जामीन मंजूर केला. मात्र, न्यायालयाने काही प्रमुख अटी व शर्तींसह हा जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार, आरोपीला येरवड्याच्या वाहतूक पोलिसात १५ दिवस काम करावे लागणार आहे. तसेच आरोपीने अपघातावर निबंध लिहावा, आरोपीने मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावेत, अशा अटी कोर्टाने घातल्या. व त्याचा अहवाल कोर्टाला सादर करावा, असं कोर्टाने सांगितलं.

आरोपीवर 304 अन्वये गुन्हा

वेंदात अग्रवालवर आयपीसी०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रथमदर्शनी पोलिसांना आरोपी मद्यपी असल्याचा संशय होता. त्यासाठी त्याची रक्त तपासणी करण्यात आली. मात्र, या चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच न्यायालयाने वेदांतला जामीन मंजूर केला. आरोपी अल्पयीन असला तरी घटनेचं गांभीर्य पाहता त्याला सज्ञान म्हणून ग्राह्य धरावं, असं पोलिसांनी कोर्टाला सांगितलं. मात्र, कोर्टाने पोलिसांची मागणी फेटाळत वेदांतला जामीन मंजूर केला.

दरम्यान, या अपघात प्रकरणात, आरोपीचे वडील आणि दारू देणाऱ्या बारवर बाल न्याय कायद्याच्या कलम 75 आणि 77 अंतर्गत कारवाई केली जात आहे, असे पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube