विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण ? शिंदेंना टेन्शन वाढवणारे फडणवीस यांचे उत्तर

  • Written By: Published:
विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण ?  शिंदेंना टेन्शन वाढवणारे फडणवीस यांचे उत्तर

Who is face of the chief minister Devendra Fadnavis Answer: लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात राज्याची विधानसभा निवडणूक होणार आहे. महायुती एकत्र निवडणूक लढल्यास मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, अशा राजकीय चर्चा सुरू आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची महायुती आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अजित पवार हे पक्ष फोडून भाजपबरोबर आलेले आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपद भूषवित आहेत. तर अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावी, अशी त्यांच्या पक्षातील नेत्यांची इच्छा आहे. एकीकडे भाजप (BJP) हा सर्वांत मोठा पक्ष आहे. अशा वेळी भाजपचा मुख्यमंत्री असावा, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीरपणे सांगितले आहे. परंतु देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका मुलाखतीमध्ये याबाबत थेट उत्तर दिले आहे. परंतु या उत्तराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे टेन्शन मात्र वाढले आहे.

मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडले, मुलाचे वडिल आणि बार मालकाविरोधात गुन्हा

मुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीस म्हणाले, आमचा सर्वांत मोठा पक्ष आहे. दोघे पक्ष आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून कुणाचा चेहरा असावा या बाबत स्पष्टता असते किंवा नसते. भाजपची रणनिती वेगळी असते. कधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला जाते, कधी जाहीर केला जात नाही. आसाम, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये तुम्ही बघितले आहे. भाजप विधानसभा निवडणूक मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करू किंवा कुणाचे नाव, चेहरा जाहीर न करता निवडणुका लढली आहे.


BJP ने पूनम महाजनांचे तिकीट का कापले? फडणवीसांना सांगितलं नेमकं कारण…

कुणाला मुख्यमंत्रीपदी बसवायचे याचा निर्णय पार्लमेंट्ररी बोर्ड घेत असतो. भाजप सर्वांत मोठा पक्ष राहिले आणि युतीमध्येही सर्वांत मोठा पक्ष हा भाजपच राहणार आहे. पण सर्वांत मोठा पक्ष आहे म्हणून आमचा मुख्यमंत्री होईल असेही नाही. मुख्यमंत्री कोण होईल हे आमच्याबरोबर असलेल्या पक्षांबरोबर चर्चा करून होईल. मुख्यमंत्रीपदाबाबत आमचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल. केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य राहिले आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणार असतील, तर आम्ही त्या निर्णयाबरोबर राहू, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज