होय, मी 2004 पासूनच भाजपची युती व्हावी म्हणून आग्रह धरला होता…; पटेलांचा मोठा खुलासा
Praful Patel on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नुकताच एका मुलाखतीत त्यांचे जुने सहकारी प्रफुल्ल पटेल (Praful Patel यांच्याबाबत मोठा दावा केला. प्रफुल्ल पटेल हे 2004 पासून भाजपसोबत (BJP) जाण्याचा आग्रह धरत होते, असं विधान पवारांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, पवारांच्या वक्तव्यावर आता खुद्द प्रफुल्ल पटेलांनी भाष्य केलं.
मोठी बातमी : इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त
प्रफुल्ल पटेल यांनी एक ट्टीट करून आपण 2004 मध्ये भाजपसोबत युती व्हावी, यासाठी पवार साहेबांकडे आग्रह धरल्याचं मान्य केलं.
होय, मी 2004 सालापासून भाजपाशी युती व्हावी असा आग्रह पवार साहेबांकडे धरला होता. तरी पण त्यांचा मान, सन्मान व त्यांच्याविषयीचा आदर असल्याने मी त्यांच्यासोबत राहिलो. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल मी सदैव त्यांचा आभारी राहीन. संधी मिळाल्यावर देशासाठी व जनतेसाठी…
— Praful Patel (@praful_patel) May 19, 2024
पटेल यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिल की, होय, मी 2004 सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवार साहेबांकडे धरला होता. तरी पण, त्यांचा मान, सन्मान व त्यांच्याविषयीचा आदर असल्याने मी त्यांच्यासोत राहिलो. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल मी सदैव त्यांचा आभारी राहीन. संधी मिळाल्यावर देशासाठी आणि जनतेसाठी चांगले काम करून पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सन्मान वाढवण्याच्या दृष्टीने मी सतत प्रयत्न केले, अशा शब्दात पटेलांनी आपली बाजू मांडली.
मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडले, मुलाचे वडिल आणि बार मालकाविरोधात गुन्हा
पुढं पटेल यांनी लिहिल की, हे देखील खरे आहे की, 1999 मध्ये काँग्रेसमध्ये सतत अपमान होत असल्यामुळं कॉंग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना पवार साहेबांना करावी लागली. तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत राहिलो.
आणि हे ही तितकेच खरे आहे की, 2004 मध्ये काँग्रेसने आमच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आल्यानंतरही राष्ट्रवादी कॉंग्रेसला मुख्यमंत्रीपद नाकारले. साहेब, तुमच्याबद्दलचा आदर कायम आहे!, असं म्हटलं.
पवार काय म्हणाले?
प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत बोलताना शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं होतं. 2004 पासून प्रफुल्ल पटेल भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रही होते. भाजपने इंडिया शायनिंग मोहीम सुरू केली तेव्हा त्यांनी भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रह धरला होता. अटलबिहारी वाजपेयींविषयी आदर असाल तरी मते मिळणार, असं मी त्यांना सांगत होत, असं पवार म्हणाले. शेवटी मी प्रफुल्ल पटेल यांना सांगितले की, तुमची इच्छा असेल तर तुम्ही भाजपसोबत जाऊ शकता, त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते, असे शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान, पटेलाच्या प्रतिक्रियेवर आता शरद पवार काय भाष्य करतात हेच पाहणं महत्वाचं आहे.