“पक्ष फुटला नसता तर मीच CM झालो असतो”; शरद पवारांचा दावा भुजबळांनी खोडला

“पक्ष फुटला नसता तर मीच CM झालो असतो”; शरद पवारांचा दावा भुजबळांनी खोडला

Chhagan Bhujbal replies Sharad Pawar : आजचा रविवारचा दिवस गाजला तो शरद पवारांच्या गौप्यस्फोटांनी. त्यांनी एका मुलाखतीत जुन्या गोष्टींचा उल्लेख केला ज्यांची चर्चा अजूनही सुरू आहे. २००४ मधील निवडणुकीत राष्ट्रवादीला जास्त जागा मिळालेल्या असतानाही मु्ख्यमंत्रिपद काँग्रेसला दिलं. शरद पवारांच्या या खेळीवर मध्यंतरी अजित पवारांना नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी याबाबत खुलासा केला. मुख्यमंत्रि‍पदासाठी त्यावेळी आमच्याकडे सक्षम उमेदवार नव्हता. छगन भुजबळांकडे मुख्यमंत्रिपद दिलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडण्याची भीती होती, असे शरद पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले.

भुजबळ म्हणाले, शरद पवारांनी काय दावा केला ते मला माहिती नाही. पण १९९५ मध्ये सरकार गेलं. त्यानंतर शरद पवारांनी मला विधान परिषदेवर पाठवलं. विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी माझ्याकडे दिली. त्या पाच वर्षांच्या काळात मी माझी जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळली. मी शिवसेना आणि भाजपविरुद्ध चांगले प्रदर्शन केले. त्यावेळी माझ्या घरावर आणि माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला. पण, सुदैवाने मी बचावलो. यावेळी काही गोष्टी घडल्या पण त्यांचा उल्लेख मी आता करणार नाही. त्यावेळी वन मॅन आर्मीप्रमाणे मी सरकारविरोधात लढत होतो.

शरद पवार अन् भाजप नेत्यात फोनवर चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

आता शिवसेना आणि भाजपविरोधात मी जे काम केलं ते पाहता ज्यावेळी आमचं सरकार आलं तेव्हा मी मुख्यमंत्री बनू शकलो असतो. परंतु, त्याआधीच आमचा पक्ष फुटला. त्यावेळी आम्ही सगळे काँग्रेसमध्ये होतो. जर काँग्रेस पक्ष फुटला नसता तर मला खात्री आहे की मीच मुख्यमंत्री झालो असतो. नंतर मला उपमुख्यमंत्रिपदी संधी मिळाली. ज्यावेळी शरद पवारांनी मला दोन वेळा उपमुख्यमंत्री केलं त्यावेळी पक्ष फुटला नाही. पण, अजित पवारांच्या नेतृत्वात मात्र पक्षात फूट पडली असे छगन भुजबळ म्हणाले.

भुजबळ पुढे म्हणाले, शरद पवार यांच्या सोबत गेलो नसतो, काँग्रेसमध्ये थांबावे असे म्हणत होते मुख्यमंत्री करतो असे काँग्रेसवाले म्हणाले होते. दिल्लीला मुख्यमंत्री घोषित करणार होते. पण मी शरद पवार यांच्या सोबत राहिलो. सहा महिने निवडणूक पुढे ढकलली. उमेदवार जाहीर होण्यापासून गोंधळ झाला. काँग्रेसपेक्षा जास्त आले असते तर मुख्यमंत्री झालो असतो. तेव्हा तिरंगी सामना झाला. अजित पवार होतेच तेव्हा शरद पवार यांच्यासोबत आलो तेव्हा मी पहिला होतो. त्यांनी मला दोन वेळा उपमुख्यमंत्रिपद दिलं पण पक्ष फुटला नाही. पण नंतर अजित पवार यांच्या नेतृत्वात पक्ष फुटला.

त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा

२००४ च्या निवडणुकीत आम्हाला जास्त जागा असल्याने काँग्रेस आम्हाला मुख्यमंत्रिपद द्यायला तयार होता. आमचे आमदार जास्त आले आहेत तर का आडून बसले आहात तर त्यांनी सांगितलं होतं. आम्ही तयार आहोत पण शरद पवार बोलत नाही, ते नाव घेतलं नाही त्यांना काय अडचण होती माहिती नाही असे छगन भुजबळ यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

काय म्हणाले होते शरद पवार?

जास्त जागा आल्या त्यावेळी छगन भुजबळांना मुख्यमंत्री करता आलं असतं या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर पक्षात फूट पडली असती असा मोठा खुलासा पवारांनी केला आहे. त्याचबरोबर 2004 पासून प्रफुल्ल पटेल हे भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेत होते. अजित पवार यांचा सातत्याने आरोप असतो की, २००४ मध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला जास्त जागा असतानाही शरद पवारांनी मुख्यमंत्रिपद घेतलं नाही. या आरोपाला शरद पवार यांनी आता उत्तर दिलं. ते म्हणाले, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या हे खरं आहे. परंतु, त्यावेळी जास्त मंत्रिपदं घेऊन मुख्यमंत्रिपद काँग्रेसला दिलं. कारण राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रिपदासाठी योग्य उमेदवार नव्हता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज