Chhagan Bhujbal : नाशिकमधून लोकसभा लढणार का? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

Chhagan Bhujbal : नाशिकमधून लोकसभा लढणार का? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

Chhagan Bhujbal on Nashik Lok Sabha Election : राज्यात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही. महायुतीत काही जागांवरून ताणाताणी सुरू आहे. त्यात नाशिक मतदारसंघाचे नाव आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचा खासदार आहे. त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी असा दावा शिंदे गटाने केला आहे. भाजपनेही या जागेसाठी जोर लावला आहे. तर मनसेही नाशिकसाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) या मतदारसंघातून इच्छुक असल्याच्या बातम्या येत आहे. या चर्चांवर आज स्वतः छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण पूर्णविराम देण्याच प्रयत्न केला.

भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाशिकची जागी आल्यास तुम्ही उमेदवारी करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर भुजबळ म्हणाले, जर तरच्या प्रश्नांना राजकारणात उत्तर नसतं. या प्रश्नांना आम्ही कसं उत्तर देणार. दोन पक्षांत भांडणं नाहीत. जागा मिळण्यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. नाशिक आमच्याकडे आली पाहिजे. नंतर चाचपणी होईल चर्चा होईल. नंतर ठरवतील आजचं कसं सांगता येईल. आम्ही काही मागणी केलेली नाही. मी काहीच अटी ठेवलेल्या नाहीत. ही जागा कुणाकडे जाते हे आधी पहावे लागेल. त्यावर आधी निर्णय होईल,  असे भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal : ..तर मग वेगळ्या कायद्याची गरजच काय? भुजबळांचा सरकारला खोचक सवाल

नाशिकचा उमेदवार कोणताही ठरो. मग तो राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा असो की भाजपाचा जो उमेदवार दिला जाईल त्याच्या पाठीमागे ताकदीने उभे राहू. भुजबळ कुटुंबियांसाठी कोणत्याही मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केलेली नाही. भुजबळ कुटुंब कोणत्याही जागेसाठी आग्रही नाही. कुटुंबातील एकाही व्यक्तीसाठी मी उमेदवारीची मागणी केलेली नाही असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

मनसे महायुतीत येत असल्याने नाशिकच्या जागेचा पेच निर्माण झाला आहे, का या प्रश्नावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले, मनसेमुळे कुठेही पेच नाही उलट महायुतीची शक्ती वाढणार आहे. आमची अडचण करण्यासाठी ते युतीत आलेले नाहीत. महादेव जानकर महायुतीकडूनच निवडणूक लढवतील अशी माझी खात्री, त्यांची कोणती जागा मिळणार हे येत्या दोन दिवसांत ठरेल, असे भुजबळ म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत भुजबळ म्हणाले, शिवसैनिकांनी अस्वस्थ होण्याचं काहीच कारण नाही. मी सुद्धा त्यांच्यातूनच आलो आहे. अनेक शिवसैनिकांनी माझ्याबरोबर साथीदार म्हणून काम केलं आहे. त्यांनी नाराज राहण्याचं काहीच कारण नाही. मुख्यमंत्र्यांकडे अनेक महत्वाची खाती त्यांच्याकडे जावेच लागते. लगेच बाहेर आलो. त्यामुळे राजकीय चर्चा होण्याचा काहीच मुद्दा उपस्थित होत नाही, असेही अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे महायुतीत येणार का? छगन भुजबळ म्हणाले, महायुतीत आम्ही त्यांचं..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज