Mumbai Traffic : तेजस्विनी नंतर ट्रॅफिक मुद्द्यावर ‘या’ अभिनेत्रीची संतप्त पोस्ट; म्हणाली…

Mumbai Traffic : तेजस्विनी नंतर ट्रॅफिक मुद्द्यावर ‘या’ अभिनेत्रीची संतप्त पोस्ट; म्हणाली…

Mumbai Traffic : मुंबई शहर आणि वाहतूक कोंडी (Mumbai Traffic) हे एक समीकरणच आहे. त्याचा त्रास सामान्यांपासून मोठमोठ्या सेलिब्रेटींना देखील होत असतो. याचच एक उदाहरण म्हणजे हास्य जत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव. तिने मुंबईतील वाहतूक कोंडीवर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर संतप्त पोस्ट केली आहे.

टीम इंडियाने अफगाणिस्तानला 272 धावांवर रोखले, बुमराहचा विकेटचा ‘चौकार

काय म्हणाली नम्रता संभेराव?

मुंबईतील वाहतूक कोंडीवर नम्रताने आपला संताप व्यक्त करत दररोज येणारा अनुभवही सांगितला. यावेळी तिने लिहिले की, ‘काय करायचं घोडबंदर रोडचं? loaded ट्रक टेम्पो पलटी होतायत साधारण रोजचा प्रवास असल्याने मी सांगू शकते किमान 95% प्रमाण आहे. बरं नेमका प्रकार काय घडलाय त्याचा हि थांगपत्ता लागत नाही.

कारण कधीकधी विनाकारण ट्रॅफिक लागतं त्यामुळे हातावर हात धरून बसणे एवढाच पर्याय.. सुखसोयी असलेले मोठमोठाले tower झालेत खरं पण सुखाचा प्रवास कसा होईल ह्याची पण काळजी घ्यायला हवी. मेट्रो चं काम चालू आहे पण ती सुद्धा गायमुख पर्यंत जिथून खरं पुढे ट्रॅफिक ला सुरुवात होते. अर्ध्या तासाच्या रस्त्याला 2 ते 3 तास लागतात. काय होऊ शकतं ह्यावर.’

Israel-Hamas: हमास कमांडरने इस्रायलवर कसा रचला हल्ल्याचा कट, वाचा सविस्तर

तेजस्विनी पंडितचा टोलवरून फडणवीसांवर निशाणा

दरम्यान दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्री तेजस्विनी पंडित हीने देखील टोलच्या मुद्द्यावरून थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरच निशाणा साधला होता. ती म्हणाली होती की, म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ??????? ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ?? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !! How can this even be a statement from the “Hon Deputy Chief Minister” Unbelievable!!SHARE IF YOU FEEL CHEATED TOO !!!’ असं म्हणत तेजस्विनीने #सगळेहुकलेत #अवघडआहेबुवा #महाराष्ट्रजागाहो. असे हॅशटॅग देखील दिले होते.

काय म्हणाले होते फडणवीस?

प्रवाशांच्या खासगी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना राज्यात टोल नाही. फक्त व्यावसायिक वाहनांकडून टोल घेतला जात आहे, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज चांगलाच समाचार घेतला. तसेच राज्य सरकारला रोखठोक इशाराही देऊन टाकला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube