टीम इंडियाने अफगाणिस्तानला 272 धावांवर रोखले, बुमराहचा विकेटचा ‘चौकार’

टीम इंडियाने अफगाणिस्तानला 272 धावांवर रोखले, बुमराहचा विकेटचा ‘चौकार’

IND vs AFG:दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (World Cup 2023) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत अफगाणिस्तानने भारताला 273 धावांचे लक्ष्य दिले आहे. अफगाणिस्तानसाठी (IND vs AFG) कर्णधार शाहिदीने 80 धावांची तर ओमरझाईने 62 धावांची खेळी केली. याशिवाय एकाही फलंदाजाला मोठी सुरुवात करता आली नाही. तर भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर बर्थडे बॉय हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाण संघाची सुरुवात विशेष झाली नाही. जसप्रीत बुमराहच्या 7व्या षटकात 32 धावांवर इब्राहिम जार्डनच्या (21) रूपाने पहिली विकेट गमावली. त्यानंतर 13व्या षटकात रहमानउल्ला गुरबाजच्या रूपाने दुसरी विकेट गमावली. 21 धावांची इनिंग खेळल्यानंतर गुरबाज हार्दिक पांड्याचा बळी ठरला. 63 धावांच्या स्कोअरवर टीमने दुसरी विकेट आणि त्याच स्कोअरवर तिसरी विकेट गमावली. संघाला तिसरा धक्का 14व्या षटकात रहमत शाहच्या (16) रूपाने बसला.

कर्णधार हशमतुल्ला शाहिदी आणि अजमतुल्ला उमरझाई यांच्या शानदार खेळीमुळे संघाला चांगली धावसंख्या गाठण्यात यश आले. हशमतुल्ला आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला अजमतुल्ला उमरझाई यांनी चौथ्या विकेटसाठी 121 (128) धावांची भागीदारी केली. दोघांच्या भागीदारीमुळे अफगाणिस्तानने 34.2 षटकांपर्यंत विकेट्स गमवली नव्हती. त्यानंतर अजमतुल्ला उमरझाईच्या रूपाने संघाला चौथा धक्का बसला. यानंतर 43व्या षटकात 225 धावांवर कुलदीप यादवने कर्णधार अजमतुल्ला ओमरझाईला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

पंकजा मुंडेंची भाजपमध्ये घुमसट! वेगळा पक्ष काढा; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

यानंतर अफगाणिस्तानला डाव सावरता आला नाही आणि त्यांनी अवघ्या 4 धावांनंतर म्हणजेच 229 धावांवर सहावा विकेट गमावली. यावेळी नजीबुल्ला झद्रानने बुमराहला झेलबाद केले. ही विकेट 45 षटकांत पडली. त्यानंतर 47व्या षटकात संघाचा अनुभवी फलंदाज मोहम्मद नबी 19 धावा करून बाद झाला. बुमराहने नबीला एलबीडब्ल्यू करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर 48व्या षटकात बुमराह रशीद खानला (16) पायचीत करण्यात यशस्वी ठरला. तर मुजीब उर रहमान 10* आणि नवीन उल हक 9* धावांवर नाबाद राहिला.

World Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियम उडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक

भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 बळी घेतले. यादरम्यान त्याने 10 षटकात 3.90 च्या इकॉनॉमीसह 39 धावा खर्च केल्या. याशिवाय हार्दिक पांड्याने 7 षटकात 43 धावा देत 2 बळी घेतले. शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनाही प्रत्येकी 1 विकेट मिळवली. बाकी सिराज आणि जडेजाला एकही विकेट मिळवता आली नाही. सिराज सर्वात महागडा ठरला. त्याने 9 षटकात 8.40 च्या इकॉनॉमीसह 76 धावा दिल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube