पंकजा मुंडेंची भाजपमध्ये घुसमट! वेगळा पक्ष काढा; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला
राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलेलं असताना भाजपमधील काही नेत्यांची घुसमट होत असल्याचं दिसून येत आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंची सध्या घुसमट होत असल्याचं बोललं येत आहे. त्यावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी पंकजा मुंडे यांना सल्ला दिला आहे. पंकजा मुंडे बहुजनांच्या नेत्या त्यांनी बहुजनांसाठी वेगळा पक्ष काढावा, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पालकांनो, मुलांकडे लक्ष द्या, आम्ही मुलांकडं लक्ष देऊनही ते….; ललित पाटीलच्या आईची प्रतिक्रिया
प्रकाश आंबेडकर म्हणाले, पंकजा मुंडे सध्या भाजपमध्ये अस्वस्थ आहेत. भाजप बहुजन विचारसरणीचा नाही. पंकजाताईंना त्यांची विचारसरणी मान्य आहे, असे दिसते. जर पंकजा मुंडेंना बहुजनांचा नेता व्हायचं असेल तर आधी त्यांना त्या पक्षातून बाहेर यावे लागेल, मग मला त्यांच्याविषयी बोलता येईल. त्यांना काही सल्ला द्यायचा असेल तर तो त्यांना वैयक्तिक देईल, जाहीररित्या सल्ला कसा देऊ? असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
‘…अन् आता मुख्यमंत्री दिल्लीला पालकमंत्री ठरवायला जातात’; सुप्रिया सुळेंचा घणाघात
सरकार पूर्णपणे गोंधळलेलं असून मुख्यमंत्र्याचा एक आदेश तर उपमुख्यमंत्र्यांचा वेगळा आदेश असतो., विरोधकांवर भाजपने धाडी घालायला नव्याने सुरुवात केली असून मणिपूर, गुजरातमध्ये जे घडले ते पुन्हा घडण्याची शक्यता आहे, अशी भीती आंबेडकरांनी यावेळी व्यक्त केली आहे.
काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपात नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांनी आपली नाराजी याआधीही बोलून दाखवली आहे. भाजप नेतृत्वाकडून त्यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा मध्यंतरी चर्चेत आला होता. तसेत त्यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर झालेली कारवाईनेही उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
पंकजा मुंडे आता राजकारणात वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे. त्यातच त्यांनी एका मुलाखतीत विधानसभेच्या तिकीटावरून थेट भाजपालाच आव्हान दिलं आहे. एका मुलाखतीत त्यांना आगामी 2024 मधील निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न देणे हा कोणत्याही राजकीय पक्षासाठी चांगला निर्णय ठरणार नाही. माझा पक्ष मला निवडणुकीत का उतरवत नाही माझ्यासारख्या उमेदवाराला तिकीट न देणं हा कोणत्याही पक्षासाठी चांगला निर्णय ठरणार नाही. त्यांनी असा निर्णय घेतला तर त्यांना लोकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.