‘…अन् आता मुख्यमंत्री दिल्लीला पालकमंत्री ठरवायला जातात’; सुप्रिया सुळेंचा घणाघात

‘…अन् आता मुख्यमंत्री दिल्लीला पालकमंत्री ठरवायला जातात’; सुप्रिया सुळेंचा घणाघात

Supriya Sule : एकेकाळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत आल्यास भूंकप होईल असं वाटायचं पण आताचे मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवायला दिल्लीला जात असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी केली आहे. दरम्यान, मुंबईत आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.

आदितीचा लाल रंगाच्या वनपीसमधील किलर लूक; चाहत्यांची नजर खिळली

सुळे म्हणाल्या, एका काळ होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत आले की, भूकंप होणार असं वाटायचं, ही मोठी बातमी व्हायची पण आता दुर्देवं आहे की, राज्याचे मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवायला दिल्लीला जातात कुठलं धोरण ठरवायला नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Maharashtra Politics : धनुष्यबाण ठाकरेंना परत मिळणार? सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

तसेच राज्यात समृद्धी मार्गाने आपल्या आयुष्यात काय बदल झाला आहे का? कदाचित सर्वांचा वेळ वाचत असेल पण काही बदल झाला नाही, पुण्यात मेट्रो ट्रेनमध्ये पैसे घालण्यापेक्षा पीएमटी एसटी बसेसमध्ये पैसा खर्च करायला हवा होता, नागपूरच्या मेट्रोत फॅशन शो, वाढदिवस अन् पत्ते खेळतात हा प्रकल्प नूकसानात आहे. तेच पैसे जर एसटीमध्ये टाकले असते तर त्याचा फायदा झाला असता, असंही त्या म्हणाल्या आहेत.

राहुल गांधींविषयी केलेल्या वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची सारवासारव; म्हणाले, माझ्या बोलण्याचा….’

राज्यात सध्या महिलांना एसटी महामंडळाच्या निर्णयाने कोणताही फायदा होत नाही. हाप तिकीटाची घोषणा केली, पण एसटी बसच आली नाहीतर महिला प्रवास कुठून करणार? त्यामुळे इतर प्रकल्पांमध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा सरकारने एसटी महामंडळ नीट केलं असत तर त्याचा फायदा नक्कीच राज्याला असता, असंही त्या म्हणाल्या आहेत.

Israel Palestine Conflict : युद्ध चिघळलं! इस्त्रायलसाठी अमेरिका मैदानात; हमासच्या कमांडरला उचललं

राज्यात मागील एक वर्षांत म्हणावं तसा काहीच बदल झालेला नाही, राज्यात बेरोजगारी, महागाई कमी झालेली नाही पण एक गोष्ट झाल्याचं दिसतंय, शाळा कमी झाल्या आणि दारुची दुकाने वाढली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, आगाम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणांसदर्भात आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून जिल्हाध्य़क्षांवर ज्या त्या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube