राहुल गांधींविषयी केलेल्या वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची सारवासारव; म्हणाले, माझ्या बोलण्याचा….’

  • Written By: Published:
राहुल गांधींविषयी केलेल्या वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची सारवासारव; म्हणाले, माझ्या बोलण्याचा….’

Vijay Wadettiwar : काल पुण्यातील एका कार्यक्रमात बोलतांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना घरचा आहेर दिला. मी गेली अनेक वर्षे राजकारणात आहे. सहा वेळा आमदार झालो. राजकारणात उत्तम वक्ता असणे खूप गरजेचं असतं. राहुल गांधी (Rahul Gandhi) हे उच्चशिक्षित आहेत. पण ते चांगले वक्ते नाहीत, असं विधान त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. दरम्यान, यावर खुद्द वडेट्टीवर यांनी भाष्य केलं.

Tejaswini Pandit : ‘टोल’वरुन तेजस्वीनी आक्रमक होताच, सोशल अकाउंटवर कारवाई; मनसे मदतीला… 

आज पत्रकार परिषदेत बोलतांना वडेट्टीवार यांना राहुल गांधींविषयी केलेल्या वक्तव्यासंदर्भात विचारले. तेव्हा ते म्हणाले की, कालच्या माझ्या विधानाचा मोठा विपर्यास केला जात आहे. मंचावर दोन राहुल होते. समोर बसलेल्या विद्यार्ध्यांना संबोधित करतांना माझ्याकडून गल्लत झाली. मंचावरील जे दोन राहुल होते, त्यांच्याकडे पाहून मी बोलत होतो. पण, राहुल गांधी यांचं नाव कायम आमच्या मुखात असतं. कारण ते आमचे नेते आहेत, त्यामुळं अनावधाने मी बोलून गेलो. मंचावर बसलेले जे राहुल कऱ्हाड होते, त्यांचीही मी स्तुती केली. आमचे नेते राहुल गांधी यांचीही मी प्रशंसा केली. पण, सोयीचं तेवढं तोडून-मोडून दाखवण्यात आलं. विरोधकांनीही याचा बाऊ केला, असं वडेट्टीवार म्हणाले.

राहुल गांधींच्या नेतृत्वात आम्ही काम करतो. ते अनेक संकटाचा सामना करून मोठं झालेलं नेतृत्व आहे. डरो मत हा संदेश देत त्यांनी देशात परिवर्तनाची लाट सुरू केली, असं म्हणत वडेट्टीवार यांनी सांगितलं की, माझी बदनामी करम्याचा हा डाव आहे. मी सरकारवर ज्या पद्धतीने तुटून पडतो, हे सहन न होत नसल्यानं हायकमांडच्या नजरेतून मला उतरवण्यासाठी हे सगळं केलं जात असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

राज्यात गेल्या काही दिवसापासून पेपरफुटीच्या घटना घडातेहत. यावरही वडेट्टीवार यांनी भाष्य केलं. राज्यात आता पेपर फुटीचा हा महारोग आला आहे. आतापर्यंत मुंबई पोलिस भरती, तलाठी भरती हे सर्व पेपर फुटले आहेत. या पेपरफुटीच्या घटनांना सरकारचा आशिर्वाद आहे का? असा सवाल त्यांनी केली. या पेपरफुटीच्या घटनांची एसआयटी मार्फत चौकशी करावी, आणि परीक्षा फॉर्म भरतांना १ हजार रुपये जी वाढीव फी घेतली होती, ती परत करावी, असं ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube