Anil Desai : बाळासाहेबांची आठवण सांगताना अनिल देसाईं भावूक, अश्रू अनावर…

Anil Desai : बाळासाहेबांची आठवण सांगताना अनिल देसाईं भावूक, अश्रू अनावर…

Anil Desai : ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई (Anil Desai) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) एक आठवण सांगतांना चांगलेच भावूक झाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी इंश्युरन्सच्या माध्यमातून देशाची आर्थिक प्रगती करण्यासाठी, शेतकऱ्यांना विमा मिळावा यासाठी प्रयत्न करतात. मात्र, हे पहिल्यांदा बाळासाहेबांनी ओळखलं होतं. आणि १९९३ मध्येच त्यांनी आपल्या शिवसैनिकांचे विमे काढून दिले होते, हे सांगतांना देसाईंना अश्रू अनावर झाले.

सांगलीच्या जागेवरून मविआत धुसफूस! विशाल पाटील बंडखोरी करणार? 

सांगलीत ठाकरे गटाचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला संबोधित करताना अनिक देसाई म्हणाले, १९९२ -९३ ला मुंबईत दंगली झाल्या, त्यावेळी बाळासाहेबांनी मुंबई सावरली होती. बाळासाहेब बऱ्याचदा शिवसेना भवनात यायचे, ते मला एलआयसीचा कार्यकर्ता म्हणून ओळखायचे. एकदा त्यांनी मला बोलावून घेतलं आणि म्हणाले, कधी काही आपत्ती येते, तेव्हा शिवसैनिक मदतीला जातो. काही दुर्घटना झाली, तिथंही माझा शिवसैनिक धाऊन जातो आणि मदत करतो. पण, कधी काही बरंवाईट झालं तर शिवसैनिकांच्या कुटुंबाची वाताहत होते. यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा त्यांनी वैयक्तिक अपघात विमा योजनेंतर्गत २५ हजार शिवसैनिकांचा विमा काढला होता, ही आठवण सांगतांना देसाईंना अश्रू अनावर झाले होते.

PM मोदी आज विदर्भात, चंद्रपूरमधून मुनगंटीवारांच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार 

आज मोदी इंश्युरन्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विमा देतात, मात्र, शिवसेना प्रमुखांना ते आधीच ओळखलं होतं आणि आपल्या शिवसैनिकाच्या कुटुंबाची वाताहत होऊ नये म्हणून प्रयत्न केले, असं देसाई म्हणाले.

एकीकडे मतदानाचा टक्का वाढवायचा आणि…
यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. देसाई म्हणाले की, राज्यात
पाच टप्प्यांत निवडणूक होत आहेत. पाच टप्प्यांत निवडणुका घ्यायची गरज नव्हती. २० मे रोजी मुंबई, ठाणे, नाशिक यासारख्या तेरा लोकसभा मतदारसंघात मतदान होतेय. मात्र, मे महिन्यात २० मेला मुंबई रिकामी असते. लोक उन्हाळ्याच्या सुट्या घालण्यासाटी गावी जाात. अशावेळी मतदान करायला मुंबईकर मुंबईत नसतील… एकीकडे मतदानाचा टक्का वाढवा म्हणून सांगितल्या जातं आणि दुसरीकडे पाच टप्यात निवडणुका घेऊन मतदानाचा टक्का कमी करण्याचा प्रयत्न करायचा, अशी टीका त्यांनी केली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube