मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्यानंतर अद्यापर्यंत आमदार अपात्रतेबाबत (MLA Disqualification ) अंतिम निर्णय झालेला नसून, सर्वांचे लक्ष विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या निर्णयाकडे लागले आहे. यातच आता नार्वेकरांनी आमदारांच्या अपात्रबाबत घेण्यात येणाऱ्या निर्णय कशा पद्धतीने लावला जाईल याचं प्लॅनिंग सांगितलं आहे. (Rahul Narvekar On Eknath Sinde MLA Disqualification)
Sanjay Raut : 2024 ला सगळ्यांचा हिशोब होणार! ‘ईडी’च्या धाडींवर राऊतांचा संताप
या प्रकरणात आपण माझ्या पद्धतीने कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घेतला जाईल असे सांगत कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही असे सांगत नार्वेकरांनी ठाकरे गटाला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. निर्णय घेण्यात उशीर करणार नाही मात्र, घाईदेखील करणार नसल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी त्यांच्या रद्द करण्यात आलेल्या परदेश दौऱ्यावरही भाष्य केले.
Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वर्षी होण्याची शक्यता मावळली
ते म्हणाले की, परदेश दौऱ्याबाबत मोठी चर्चा घडवून आपणचं हा दौरा रद्द करायला लावला असे चित्र जनतेसमोर आणण्याचा केविलवाणा प्रकार काही लोकांकडून आणि नेत्यांकडून करण्यात आला. माझा परदेश दौरा 26 सप्टेंबर रोजीच रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आला होता असेही नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. याबाबत CPA लादेखील कळवण्यात आल्याचे नार्वेकर म्हणाले. अध्यक्ष काही तुमच्या गिधड धमक्यांनी घाबरत नसल्याचे सांगत नियमानुसारच सर्व गोष्टी होणार आहेत.
Cloud Burst Sikkim : सिक्कीममध्ये ढगफुटी! लष्कराचे 23 जवान झाले बेपत्ता
अनेक माध्यमातून अनेक लोकांकडून माझ्या निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. मी ज्या तरतुदी आहेत, त्यावर निर्णय घेईन. मी माझ्या पध्दतीने कायद्याने निर्णय घेणार असे सांगत मी नियमानुसार काम करणार आहे. कसंही करून अध्यक्ष यांच्यावर दबाव आणायचा, असा प्रकार सुरू आहे. पण मी दबावापेक्षा नियमानुसार काम करणार आहे.
“मी अशा आरोपांवर उत्तर देणं आवश्यक समजत नाही. नियम पाळणं म्हणजे लोकशाहीची हत्या आहे का? कुणाचीही बाजू न ऐकता, मी निर्णय दिला, तर उद्या हेच लोक बोलणार की, अध्यक्षांना नियम आणि संविधानाचे ज्ञान नाही. त्यामुळे सर्वांना संधी दिली जाणार, कुणीही कुठलाही आरोप केला तरी मी नियमात काम करणार असल्याचे नार्वेकरांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाला इशारा दिला आहे.