Download App

‘२ दिवसांत हल्लेखोरांना अटक करा, नाही तर…’; रामभक्तांवर झालेल्या हल्यानंतर प्रताप सरनाईक आक्रमक

  • Written By: Last Updated:

Pratap Sarnaik : संपूर्ण देश राममय झालेला असताना मिरारोड येथे काल रात्री श्रीराम (Shriram) भक्तांवर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याकरिता तात्काळ एस.आय.टी. (SIT) स्थापन करून या प्रकरणी दोषी असलेल्या सर्व आरोपींवर पुढील ४८ तासांत कठोर कारवाई करावी, अन्यथा शांततामय मार्गाने मिरा-भाईंद (Mira-Bhyander) शहर बंदची हाक द्यावी लागेल, असा इशारा आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी आज दिला.

श्रीराम मंदिरानंतर आता अयोध्येत साकारणार भव्य मस्जिद; मुस्लीम पक्षकारांकडून तारखेची घोषणा 

आज प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असतांना मिरा रोडच्या नया नगर परिसरामध्ये काल रात्री (२१ जानेवारी) ला १०.३० च्या सुमारास राडा झाला आहे. ज्या गाड्यांवर श्रीराम नावचे झेंडे होते, त्या गाड्यांची तोडफोड झाली आहे. या हिंसक घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे. याबाबत मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेना शिष्टमंडळासह आज तातडीने सकाळी भेट घेतली.

रामलल्ला विराजमान, दर्शनाला जाण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आरती वेळ अन् प्रसिद्ध ठिकाण 

यावेळी आमदार सरनाईक यांनी सांगितले की, मिरा-भाईंदर शहर हे विविध जाती धर्माच्या नागरिकांचे शहर म्हणून देशभरात ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांचा इतिहास या शहरातील हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई, जैन तथा सर्व भाषेची नागरिक गुण्यागोविंदाने एकत्रितपणे राहत आहेत. देशामध्ये अनेक वेळा जातीय दंगली भडकलेल्या असताना मिरा-भाईंदर शहरामध्ये त्याचे पडसाद उमटले नाहीत. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमधे होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला मिरा-भाईंदर शहरातील रामभक्तांवर हल्ला झाला. रामभक्त शांतताने गाडीवर बजरंगबलीची प्रतिकृती लावून व राम नामाचे भगवे ध्वज लावून शहरामध्ये रामनामाचा जयघोष करीत फिरत असताना नयानगर परिसरातील काही समाजकंटकांनी हल्ला करून राम ध्वजाची मोडतोड केली. बजरंगबलीच्या प्रतिमेची विटंबना केली. एवढेच करून थांबले नाही तर त्या गाडीमध्ये बसलेल्या रामभक्तांना मारहाण देखील केली. या देशामध्ये कुठेही श्रीरामाचा जयघोष करणे किंवा अल्ला-हो- अकबर चा नारा देणे हा काही गुन्हा ठरत नाही, मात्र, काल श्रीरामाचा जयघोष करणाऱ्या रामभक्तांवर काही समाजकंटकांनी अल्ला हो अकबरचा नारा देत त्यांच्या गाड्या फोडल्या, असं सरनाईकांनी सांगितलं.

Ram Mandir: राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याविषयी व्यक्त होताना गायक सोनू निगम झाला भावुक 

सोशल मिडीयावर हे व्हिडीओ जाणिवपूर्वक टाकले गेले. कारण शहरातील शांतता या समाजकंटकांना बिघडवायची होती. या व्हिडीओची छाननी केल्यानंतर मी स्वतः रात्री उशीरा डी.सी.पी. जयंत बजबले यांच्याशी चर्चा करून या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना केल्या. तसेच या घटनेच्या निषेधार्थ टेम्बा हॉस्पिटलमध्ये जमलेल्या रामभक्त नागरिकांना शांत करण्यासाठी मिरा-भाईंदर विधानसभा क्षेत्राचे प्रमूख विक्रम प्रताप सिंह यांना तेथे पाठवून शहरात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला , असे आमदार सरनाईक म्हणाले.

आमदार सरनाईक म्हणाले की, आज देशभरामध्ये राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त समस्त हिंदूची दिवाळी साजरी होत असताना या आनंदामधे देशभक्त मुसलमान ही सामील होत आहे. मात्र, शहरातील हिंदू व मुस्लिमांचे ऐक्य काही समाजकंटकांना नकोसे आहे. त्यामध्ये काही राजकिय नेत्यांचा सहभाग सुध्दा असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी जरी ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून १० ते १५ जणांना अटक केली. मात्र, या व्हिडीओची सत्यस्थिती पाहता या प्रकरणामध्ये किमान २०० ते ३०० समाजकंटकांचा सहभाग दिसत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याकरिता तात्काळ एस.आय.टी. स्थापन करून या प्रकरणी दोषी असलेल्या सर्व आरोपींवर पुढील ४८ तासांत कठोर कारवाई करावी, अशी मागणी सरनाईक यांनी केली. अन्यथा रामभक्तांबरोबर आंदोलनात सहभागी होऊन शिवसेना पक्षातर्फे शांततामय मार्गाने मिरा-भाईंदर शहर बंदची हाक द्यावी लागेल, असंही सरनाईक म्हणाले.

दरम्यान, आमदार सरनाईक यांचे म्हणणे ऐकून योग्य ती कडक कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासन करेल, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले आहे.

follow us