Download App

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या ट्रेलरमधून कार्यक्रर्त्यांना ‘पंचसूत्री’

मुंबई : 22 मार्च म्हणजेच गुढीपाडव्याच्यादिवशी (Gudipadwa) मनसेचा (MNS) शिवाजी पार्कवर मेळावा होते. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj thackeray) एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते की, आपल्याला बरेच काही बोलायचे आहे. येत्या गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवरुन (Shivaji Park) बोलणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे शिवाजी पार्कवरुन राज गर्जना काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असताना आज मनसेने मेळाव्याचा ट्रेलर लॉन्च केला आहे. यामध्ये हिंदुत्व आणि मराठी मुद्द्याला हात घातला आहे.

मनसेने आपल्या ट्रेलरमधून एकप्रकारे मुंबई महापालिकेचं रणशिंग फुकले आहे. त्यामध्ये मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. ‘हिंदू – ही 2 अक्षरं जगा! मराठी .. या 3 अक्षरांवार प्रेम करा! महाराष्ट्र … या 4 अक्षरांसाठी काम करा! राज ठाकरे … ही 5 अक्षरं नेहमीच पाठीशी असतील!’ असे ट्रेलरमध्ये म्हटले आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा निशाण्यावर कोण असणार हे त्यातून दिसून येत आहे.


Ram Shinde Vs Rohit Pawar : बारामती ॲग्रोच्या संचालकांवर गुन्हा दाखल!

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात भेटीगाठी वाढल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मनसेला ही निवडणूक सोपी नसणार आहे. त्यामुळे भविष्यात मनसे, भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येणार का? अशी देखील शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे संभाव्य युतीबद्दल काही भाष्य करतील का? याची कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.

Tags

follow us