Download App

खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाला अटक, गोवंडी पोलिसांची कारवाई, नेमकं प्रकरण काय?

काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा मुलगा गणेश हंडोरे (Ganesh Handore) यांना अटक करण्यात आली

  • Written By: Last Updated:

Ganesh Handore arrested : काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा मुलगा गणेश हंडोरे (Ganesh Handore) यांना अटक करण्यात आली आहे. गणेश हंडोरे यांनी काल रात्री साधारणत: 10 वाजताच्या सुमारास चेंबूर येथे एका दुचाकीला उडवून तेथून पळ काढल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर गोवंडी पोलिस स्थानकात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शेष भारताचे स्वप्न भंग, 27 वर्षांनंतर मुंबईने जिंकले इराणी चषक 

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश हंडोरे हे ज्यूस पिण्यासाठी गोवंडीच्या दिशेने गेले होते. मात्र परतत असताना चेंबूर येथील आचार्य महाविद्यालयाजवळ गोपाल आरोटे नावाच्या दुचाकीस्वाराला त्यांनी धडक दिली. गणेश हंडोरे यांच्या कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गणेश हंडोरे यांना अटक केली आहे.

दरम्यान, गणेश हंडोरे यांना अटक केल्यानंतर त्यांची शुगर वाढली, त्यानंतर त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गणेश हंडोरे यांच्या कारच्या धडकेत जखमी झालेले गोपाळ आरोटे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच याप्रकरणी गोवंडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

वडगाव शेरीत टिगरेंची उमेदवारी कापणार? पवारांच्या इशाऱ्यानंतर अजितदादांचा मूड बदलला? 

गणेश हंडोरे यांच्याविरुद्ध शनिवारी गोवंडी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी कलम 110, 125 (अ), (बी), 281, बीएनएस आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 134 (अ), (बी), 184 नुसार गुन्हा दाखल करून गणेश हंडोरे याला अटक केली.

कोण आहेत चंद्रकांत हांडोरे?

अटक करण्यात आलेल्या गणेश हंडोरेचे वडिला चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेसचे राज्यसभा सदस्य आहे. तआंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. 2022 च्या विधानपरिषद निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने ते चर्चेत आले होते. याशिवाय ते अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा होती. मात्र काँग्रेसने त्यांना राज्यसभा दिल्याने ते कॉंग्रेसमध्ये थांबलेत.

follow us