वडगाव शेरीत टिगरेंची उमेदवारी कापणार? पवारांच्या इशाऱ्यानंतर अजितदादांचा मूड बदलला?
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची काही दिवसांपूर्वी वडगाव शेरी येथे जाहीर सभा झाली होती. या सभेत पोर्शकार अपघाताचा उल्लेख करत त्यांनी आमदार सुनील टिंगरेंना (Sunil Tingre) इशारा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघात टिंगरेंऐवजी दुसरा उमेदवार अजित पवार (Ajit Pawar) देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, अजित पवारांनी सुनील टिंगरेंच्या मागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतली.
भावाला ६४ वेगवेगळ्या नंबरवरुन ब्लॅकमेलरचे फोन; बहिणीच्या मृत्यूनंतरही दिले १९ लाख रुपये
अजित पवार म्हणाले, मधल्या काळात आमदार सुनील टिंगरेंचा एका प्रकरणाशी संबंध नसतांना त्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्यात आलं. त्यांनी मतदारसंघात केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. त्यामुळं काळजी करू नका. तुमच्या मनातलाच उमेदवार मी वडगाव शेरीमध्ये देणार आहे. पोर्श प्रकरणाचा उल्लेख न करता अजितदादांनी आपण आमदार सुनील टिंगरे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले.
रामराजेंच्या मनात तुतारी? तिकीट कन्फर्म असलेला शिलेदारही देणार अजितदादांना धक्का..
पुढील पाच वर्षात 5 हजार कोटी देईल…
सुनील टिंगरे यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांचे उद्घाटन अजितदादांच्या हस्ते झाले. त्यावेळी अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, वडगाव शेरीतील विकासकामांसाठी मी निधी दिला आहे. 15 कोटी रुपये खर्चून साडेसात एकरात राजमाता जिजाऊ उद्यान साकारले आहे. या उद्यानाच्या उर्वरित कामासाठी मी नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर करणार आहे. महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्यास पुढील पाच वर्षात 5 हजार कोटी देऊ, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.
राज्यात घडणाऱ्या लैंगिक शोषणाच्या घटनांच्या विरोधात कठोर कारवाई करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री प्रयत्नशील आहोत. लैंगिक शोषणाच्या घटना रोखण्यासाठी आम्ही राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांशी बोलून अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे अजित पवार म्हणाले.
मी शब्दाचा पक्का
सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. आम्ही आमच्या शब्दांचे पक्के आहोत. मी सांगतो तसं वागतो. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरपर्यंत लाडक्या बहिणींना भाऊबीजेच्या रुपात देणार असल्याचं अजितदादा म्हणाले.
दरम्यान, वडगाव शेरी मतदारसंघावर सुनील टिंगरे आणि भाजपचे जगदीश मुळीक यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्यामुळं महायुतीमध्ये वडगाव शेरीत कोणाला उमेदवारी मिळणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.