शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांना टिंगल करण्याचा अधिकार पण …, संभाजीराजेंचे पवारांना प्रत्युत्तर

शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांना टिंगल करण्याचा अधिकार पण …, संभाजीराजेंचे पवारांना प्रत्युत्तर

Sambhaji Raje On Sharad Pawar : पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत. माझी टिंगल करण्याचा त्यांनाच अधिकार आहे. मी बाकी कुणाकडून झालेली टिंगल खपवून घेत नाही. असं म्हणत संभाजीराजे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना प्रत्युत्तर दिले . माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी तिसऱ्या आघाडीवर भाष्य केले होते. यावर आज संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी उत्तर दिले आहे. ते आज संविधान पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत. माझी टिंगल करण्याचा त्यांनाच अधिकार आहे. मी बाकी कुणाकडून झालेली टिंगल खपवून घेत नाही. यावेळी मला महात्मा गांधीचे वाक्य आठवत आहे. ते म्हणाले होते पहिल्यांदा लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतील आणि नंतर तुमच्यावर हसतील, मग तुमच्यासोबत लढतील आणि मग तुम्ही जिंकाल. आम्ही त्या विचारावर चालतो असं म्हणत त्यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले.

तसेच यावेळी त्यांनी पवार साहेब वेळोवळी आरक्षण बाबत सांगत असतात. मला माहिती आहे जे 10 टक्के आरक्षण वाढवून दिलं आहे त्यात सर्वांचा सह्या आहेत. पण मराठा समाजाला ते मान्य नाही. 75 टक्के हवं तर पवार साहेब यांनी द्यायला हवं होतं असं देखील म्हटले आहे.

कितीही रोखायचा प्रयत्न केला तरी आम्ही तिथे जाणार

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आमचे होर्डिंग्ज लावत असलेल्या कामगारांना पोलिसांकडून मारहाण करण्यात येत आहे असा गंभीर आरोप देखील यावेळी त्यांनी केला. यावेळी ते म्हणाले की, 2016 ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन झाले. कोट्यवधी रुपये खर्च करून हाती घेण्यात आलेलं स्मारकाचे काम कुठपर्यंत आलं ते पाहण्यासाठी उद्या आम्ही जाणार आहोत.

त्याबाबतचे फलक आम्ही मुंबईत लावले होते, ते काढून टाकण्यात आले. आम्ही बोटी बुक केल्या त्यांना समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ही राज्य सरकारची केवळ दडपशाहीच नाही मुघलशाही आहे. आमचे होर्डिंग्ज लावत असलेल्या कामगारांना खेरवाडीच्या गुरव नावाच्या पोलीस निरीक्षकाने पोलीस स्टेशन मध्ये मारहाण केली. असं आरोप देखील त्यांनी यावेळी केला तसेच स्वतःची चूक झाकायची आणि आम्हाला तिथे जाऊ द्यायचे नाही. आम्हाला कितीही रोखायचा प्रयत्न केला तरी आम्ही तिथे जाणार.

सर्वात मोठी बातमी! अमेरिका आणि ब्रिटनकडून येमेनची राजधानी सानावर हल्ला

आम्ही आमच्या अधिकार म्हणून तिथे जाणार आहोत. आज पर्यावरण तसेच इतर कारणांमुळे स्मारकाचे काम होत नसल्याचे सांगण्यात येतंय. मग याचा आधी का नाही विचार केला. पंतप्रधांनानी जलपूजन केलं. ते काय फक्त निवडणूक होती म्हणून काय? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube