Mumbai : मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Woman Sucide at Mumbai Mantralay :  मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही महिला धुळ्याची राहणारी होती. शीतल गादेकर असे या महिलेचे नाव आहे. काल ( 27 मार्च ) रोजी या महिलेने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर पोलिसांनी सदर महिलेल्या जे जे रुग्णालयात दाखल केले होते. पण तिचा मृत्यू […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 28T141312.499

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 28T141312.499

Woman Sucide at Mumbai Mantralay :  मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही महिला धुळ्याची राहणारी होती. शीतल गादेकर असे या महिलेचे नाव आहे. काल ( 27 मार्च ) रोजी या महिलेने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर पोलिसांनी सदर महिलेल्या जे जे रुग्णालयात दाखल केले होते. पण तिचा मृत्यू झाला आहे.

धुळे एमआयडीसीतीमधील एका प्लॉटसंदर्भात वाद होता. या वादातूनच सदर महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. शीतल गादेकर या महिलेच्या नावावर धुळे एमआयडीसमधील परिसरात प्लॉच नंबर पी 16 आहे. हा प्लॉट 2010मध्ये तत्कलीन एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी फसवणूक करुन कुमार मानकचंद मुनोत या व्यक्तीच्या नावावर खोटी नोटरी बनवून नावावर करुन घेण्यात आल्या. यासंदर्भातील तक्रार शितल गादेकर यांनी अनेकवेळा प्रशासनाकडे केली होती.

निवडणुका कधीही होतील, तयार राहा ; जयंत पाटलांचे पदाधिकाऱ्यांना आदेश

याबाबत त्यांनी माजी मुख्यमंत्री, माजी उद्योग मंत्री, माजी मुख्य सचिव, तसेच प्रधान सचिव, मुख्य न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालय, रजिस्टर जनरल अधिकारी मुंबई उच्च न्यायालय, तसेच पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक नाशिक परीक्षेत्र, पोलीस अधीक्षक धुळे, तसेच प्रादेशिक एमआयडीसी अधिकारी, विभागीय एमआयडीसी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा मुख्य न्यायाधीश, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या.

राघव चड्डा आणि परिणीती चोप्राचा साखरपुडा झाला? ‘आप’ खासदाराच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चर्चांना उधाण

या जागेवरुन गेली अनेक वर्ष त्या संघर्ष करत होत्या. तसेच 27 मार्च रोजी मंत्रालयात आत्मदहन करणार असा इशारा देखील त्यांनी मागच्या महिन्यात दिल्या होता.

 

Exit mobile version