Mumbai Airport proposes to collect User Development Fee : मुंबई एअरपोर्टवर आता प्रवाशांकडून युजर डेव्हलपमेंट फी आकरण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. यामध्ये देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 325 रूपये तर देशाबाहेरील प्रवाशांसाठी 650 रूपये आकारण्यात येणार आहेत. त्यामुळे आता विमान प्रवास वाढण्याची शक्यता आहे.
…मग महाराष्ट्रातील रस्त्यांवर इतका खर्च कसा? जयंत पाटलांनी टेंडरवरून सरकारला घेरले
दरम्यान अदानी एअरपोर्ट्सद्वारे संचलित मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी हे शुल्क आकारण्यात येणार आहे. या अगोदर देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून कोणतीही फी आकरली जात नव्हती तर देशाबाहेरील प्रवाशांसाठी 187 रूपये आकारण्यात येत होते.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रीपेड रिक्शा सुरू करणे…
परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सर्व व्यवस्थापन अदानी समूहाकडे आहे. त्यामुळे अदानी समूह व परिवहन विभागाच्या समन्वयातून येत्या दोन महिन्यांत प्रिप्रेड रिक्षा सेवा सुरू करण्यासाठी सर्व आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात. ते म्हणाले की,या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि सुलभरित्या प्रवासी सुविधा उपलब्ध होणार असल्याने विमानतळाचे व्यवस्थापन पहाणाऱ्या अदानी समुहाने परिवहन विभागाच्या सहकार्याने १ जुन पासून प्रिप्रेड रिक्षा सेवा सुरू करावी.