Mumbai Attack : मुंबईच्या 26/11च्या हल्ल्याचा (Mumbai Terror Attack) कथित सूत्रधार तहव्वुर हुसेन राणा (Tahawwur Rana) याला कडक सुरक्षेत भारतात आणण्यात आलंय. आता वैद्यकीय तपासणीनंतर राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयए (NIA Court) त्याची चौकशी करणार आहे. या हल्ल्यात मृत पावलेले पोलिस कर्मचारी तुकाराम ओंबाळे यांच्या बंधूंनी सरकारकडे विनंती केलीयं. तहव्वूर राणाचा एकेक अवयव छाटून मीठाचा मारा करा, अशी विनंती ओंबाळेंनी माध्यमांशी बोलताना केलीयं.
“मी कालही शरद पवारांना दैवत मानत होतो, आजही मानतो पण..”, अजितदादांच्या मनात काय?
पुढे बोलताना ओंबाळे म्हणाले, मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यात शेकडो नागरिक पोलिस बांधव मारले गेले आहेत. कसाबच्या बाबतीत जसा न्यायालयीन प्रक्रियेला वेळ गेला तो जाऊ द्या पण पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला. या प्रकरणी वकील उज्वल निकम यांनी चांगली बाजू मांडली. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन राणाला खुलेआम फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी ओंबाळे यांनी यावेळी केलीयं.
ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील त्रुटी दूर करणार, CM फडणवीसांनी दिले आश्वासन
तसेच राणाला खुलेआम जनतेत आणून शरीराचा एकेक अवयव छाटून त्यावर मीठाचा मारा करावा, अशीही विनंती त्यांनी केलीयं. आपल्या कायद्यात तरतूद नाही पण सरकारने ही तरतूद केली पाहिजे. आमच्या देशावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला आम्ही शिक्षा देऊ शकतो हे दाखवून द्या, अतिरेक्यांना हलाल करुन मारावं, या शिक्षेमुळे अतिरेक्यांवर जरब बसेल, असंही ओंबाळे म्हणाले आहेत.
मुंबईच्या 26/11च्या हल्ल्याचा कथित सूत्रधार तहव्वुर हुसेन राणा याला कडक सुरक्षेत भारतात आणण्यात आलंय. आता वैद्यकीय तपासणीनंतर राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयए त्याची चौकशी करणार आहे. यानंतर इतर तपास संस्था यात सहभागी होऊ शकतात. 2008 मध्ये मुंबई हल्ल्यानंतर, एनआयएची स्थापना केंद्रीय दहशतवाद विरोधी संस्था म्हणून करण्यात आली. राणाचा खटला एनआयएमध्ये चालला, तरी त्याचं स्वतःचं असं कायमस्वरूपी न्यायालय नाही. उलट अशा प्रकरणांत सत्र न्यायालयांना अधिसूचना देऊन विशेष न्यायालये बनवली जातात.