कोण आहेत ‘ते’ तीन अधिकारी? तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात आणण्यात बजावली महत्त्वाची भूमिका

Three Officers Special Role In Tahawwur Rana Extradition : 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा (Tahawwur Rana) याच्या प्रत्यार्पणासाठी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष पथकाने अमेरिकेत (America) महत्त्वाची जबाबदारी बजावली. या पथकाच्या प्रयत्नांनंतर, अमेरिकन न्यायालयाने राणाच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले, ज्या अंतर्गत त्याला आता भारतात आणले आहे. पथकातील अधिकाऱ्यांनी केवळ अमेरिकेतच केस चालवली नाही, तर त्याची सुरक्षा आणि भारतात (Tahawwur Rana Case) चौकशीची तयारी देखील सुनिश्चित केली.
‘ते’ तीन अधिकारी
या टीममध्ये आशिष बत्रा यांचा समावेश आहे. ते झारखंड पोलिस कॅडरचे 1997 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. सध्या एनआयएमध्ये महानिरीक्षक (आयजी) म्हणून तैनात असलेले बत्रा यांनी जहानाबाद आणि रांची सारख्या भागात काम केलंय.
या टीममधील दुसरी महत्त्वाची सदस्य जया राय आहे. त्या 2011 च्या बॅचच्या झारखंड कॅडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. उपमहानिरीक्षक (डीआयजी) म्हणून काम करणाऱ्या जया सध्या एनआयएमध्ये वरिष्ठ जनसंपर्क अधिकाऱ्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. त्यांच्या उपस्थितीने टीमला बळकटी मिळाली.
मानवी दात धोकादायक शस्त्र नाही; जाऊबाई कडकडून चावलेल्या मॅटरवर मुंबई HC चा निकाल
तिसरे अधिकारी प्रभात कुमार आहेत, ते छत्तीसगड कॅडरचे 2019 बॅचचे आयपीएस आहेत. एनआयएमध्ये पोलिस अधीक्षक (एसपी) म्हणून कार्यरत असलेल्या प्रभातने अमेरिकेत टीमसोबत काम केले. राणाला भारतात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ते दिल्ली विमानतळापासून एनआयए मुख्यालयापर्यंतच्या संपूर्ण ऑपरेशनचा समन्वयक देखील आहे. या पथकाने अमेरिकेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर राणाला ताब्यात घेतले.
राणाला दिल्लीतील तिहार तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. तिथे त्याच्या सुरक्षेची आणि चौकशीची व्यवस्था करण्यात आलीय. हे प्रत्यार्पण भारताच्या राजनैतिक आणि कायदेशीर यशाचं प्रतीक आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्याशी संबंधित तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाच्या खटल्याचा निकाल अखेर दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताच्या बाजूने लागला. अमेरिकन न्यायालयांमध्ये एकामागून एक याचिका फेटाळण्यात आल्या. त्यामुळे राणाला प्रत्यार्पणासाठी भारताचा मार्ग मोकळा झाला. या प्रक्रियेत अनेक महत्त्वाचे टप्पे होते.
128 वर्षांनंतर ‘गोल्ड मेडल’ साठी भिडणार क्रिकेट संघ, 2028 ऑलिंपिकमध्ये अमेरिकेसह ‘या’ संघाला संधी?
प्रमुख घडामोडी
ऑगस्ट 2024 : अमेरिकेच्या नवव्या सर्किट कोर्ट ऑफ अपीलने तहव्वुर राणाच्या भारतात प्रत्यार्पणाच्या आदेशाला मान्यता दिली. या निर्णयामुळे राणाविरुद्ध भारताचा दावा बळकट झाला.
नोव्हेंबर 2024 : राणाने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात अपीलीय न्यायालयाच्या निर्णयाचा आढावा घेण्यासाठी रिट ऑफ सर्टिओरारी (पुनरावलोकन याचिका) दाखल केली. हे त्याच्याकडून एक मोठे कायदेशीर पाऊल होते.
जानेवारी 2025 : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाची याचिका फेटाळली. या निर्णयामुळे भारतासाठी प्रत्यार्पणाचा मार्ग सोपा झाला.
मार्च 2025 : राणाने प्रत्यार्पण थांबवण्यासाठी आपत्कालीन याचिका दाखल केली, परंतु सर्वोच्च न्यायालयाने ती देखील फेटाळून लावली. हा त्याच्याकडून शेवटचा मोठा प्रयत्न होता.
एप्रिल 2025 : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तहव्वुर राणाचे अंतिम अपील फेटाळले. यामुळे राणाला भारतात प्रत्यार्पण करण्यासाठीचे सर्व कायदेशीर अडथळे दूर झाले.